लांजा महाविद्यालयाला DBT Star काॅलेज योजनेंतर्गत ८२ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त

लांजा महाविद्यालयाला DBT Star काॅलेज योजनेंतर्गत ८२ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त

लांजा / मिलिंद बेर्डे
लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान विद्या शाखेला नुकतेच केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत DBT स्टार काॅलेज योजनेंतर्गत ₹ ८२ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे.* सदर अनुदान हे पुढील तीन वर्षासाठी प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील (DBT) जैवतंत्रज्ञान विभागाकडून दरवर्षी विज्ञान शाखेसाठी देशभरातून शहरी व ग्रामीण भागातील महाविद्यालयां कडुन प्रस्ताव मागविण्यात येतात. लांजा महाविद्यालयाने सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांत सदर प्रस्ताव सादर केला होता. देशभरातून शेकडो महाविद्यालय प्रस्ताव सादर करतात. यामध्ये देशभरातून एकुण १७ महाविद्यालयांची ग्रामीण भागातुन निवड करण्यात आली. प्रस्तावांची छाननी करून लांजा महाविद्यालयाला प्रस्ताव सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. योग्य सादरीकरणा नंतर ग्रामीण भागातुन लांजा महाविद्यालयाची निवड करण्यात आली, ज्यामध्ये महाराष्ट्रातील चारच महाविद्यालयांची निवड झाली.
या योजनेंतर्गत महाविद्यालयातील रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र आणि गणित या विभागांसाठी सदर अनुदान उपलब्ध झाले आहे. या अनुदानातून वरील चारही विभागांसाठी एकत्रित पणे ₹ ४० लाखांचे प्रयोगशाळेत लागणारे अत्याधुनिक साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित रक्कम ही महाविद्यालयातील विविध उपक्रम राबविण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
केंद्र सरकारची ही योजना शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरीष्ठ महाविद्यालयात विज्ञान विषयात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सभा, शैक्षणिक सहली, औद्योगिक क्षेत्रांना भेटी, इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे. तसेच महाविद्यालयात विज्ञान विद्या शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि आधुनिक तंत्रज्ञान व त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या नोकरी, व्यवसाय, प्रकल्प प्रस्ताव व त्याची उभारणी, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादीं बाबत संपूर्ण मार्गदर्शन महाविद्यालयातील चारही विभागांतर्फे घेण्यात येईल.
ही योजना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिनही जिल्ह्य़ातुन फक्त लांजा महाविद्यालयाला प्राप्त झाली ही विषेश उल्लेखनीय बाब आहे.
या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून डाॅ. राजेंद्र शेवडे सर यांची निवड करण्यात आली आहे.
सदर योजना प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी विशेष मेहनत घेतली व त्यांचे अमुल्य असे मार्गदर्शन मिळाले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. काशिनाथ चव्हाण सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. ही योजना महाविद्यालयाला प्राप्त करून देण्यासाठी न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भाऊसाहेब वंजारे, कार्याध्यक्ष मा. श्री. जयवंतभाऊ शेट्ये, उपकार्याध्यक्ष मा. श्री. सुनीलजी कुरुप, सचिव मा. श्री. विजयजी खवळे, सहसचिव मा. श्री. संजय तेंडुलकर व सर्व संचालक आणि पदाधिकरी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख श्री. बी. टी. शिंदे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विक्रांत बेर्डे, गणित विभाग प्रमुख डॉ. रंजन खातु आणि विज्ञान विद्या शाखेचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग यांनी मेहनत घेतली. महाविद्यालय कार्यालयीन अधीक्षक श्री. किशोर मानकर, मुख्य लिपिक सौ. साधना रेगोडकर, वरीष्ठ लिपिक श्री. सचिन डाफळे, कनिष्ठ लिपिक श्री. अभिजित शेट्ये, श्री. संजय लोकरे व श्री. रोहित तळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या या योजनेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही मोलाचा वाटा आहे.
रत्नागिरी जिल्हा, तसेच रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक व अन्य क्षेत्रातून महाविद्यालय व संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns