तर दीनानाथ मध्ये नाट्यप्रयोग करायचा की नाही याचा विचार करावा लागेल – अमेय खोपकर

तर दीनानाथ मध्ये नाट्यप्रयोग करायचा की नाही याचा विचार करावा लागेल – अमेय खोपकर

विले पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाचे भाडे महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊनच भरण्याच्या निर्णयामुळे नाट्यकर्मी नाराज झाले असून जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने या विरोधात आवाज उठवला आहे, तसेच वॉर्ड मध्ये जाऊन भाडे भरण्याची हि प्रथा बंद झाली नाही
तर निर्मात्यांना दिनानाथ मध्ये नाट्यप्रयोग करायचा की नाही याचा विचार करावा लागेल असा इशारा दिला आहे.

कोणत्याही निर्मात्याला विश्वासात न घेता तसेच निर्मात्यांना कोणतीही पूर्वसूचनाही न देता १३ जून पासून हा निर्णय लागू करण्यात आला असून सदरहू नियम ताबडतोब रद्द करा अन्यथा एखाद्या हाऊस फुल्ल कार्यक्रमाचे किंवा नाटकाचे भाडे भरले गेले नाही आणि नाट्यगृहात मध्ये प्रेक्षकांनी काही हुल्लडबाजी केली. थिएटरला नुकसान पोहचवले तर नाट्यनिर्माता किंवा आयोजक या नुकसानीची जबाबदारी घेणार नाही. असा सज्जड इशारा संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी वॉर्ड ऑफिस ला दिला आहे.

आधीच गेल्या दोन वर्षात या नाट्यनिर्मात्यांच अतोनात नुकसान झालं आहे आता काही थोड्या प्रमाणात निर्माते नाटकात नुकसान असून सुध्दा नाटक सुरु ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. तेंव्हा असे नवीन नवीन नियम करुन बृहन्मुंबई महानगर पालिका नाट्यनिर्मात्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या वरिष्ठांनी हा नियम बनवला आहे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. असेही खोपकर पुढे म्हणाले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns