Donkey…Dunki…क्या मालूम क्या बना रहा है पर ले लो ले लो – शाहरुख खान
मंगळवार १९ एप्रिलला दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी शाहरुखला घेऊन डंकी ( DUNKI ) चित्रपटाची ट्विटरवर घोषणा केली आणि लगेच शाहरुख खानने राजकुमार हिरानींचे आपल्या ट्विटर हँडल वरून आभार मानले. शाहरुख म्हणतो “डिअर राजकुमार हिरानी सर आप तो मेरे सांताक्लॉज निकले. आप शुरू करो मैं टाईम पें पहुंच जाऊंगा, ऍक्च्युली मै तो सेट पर ही रहने लगुंगा, Feeling humbled & excited to finally work with you.
मंगळवारी राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शाहरुख खान व तापसी पन्नू यांना घेऊन ‘डंकी’ चित्रपटाची घोषणा केली.
चित्रपटाबद्दल राजकुमार हिरानी म्हणाले, “माझ्या कारकिर्दीत शाहरुख खान नेहमीच माझ्या यादीत राहिला आहे आणि यापूर्वी अनेकदा काम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, शेवटी ‘डंकी’ मध्ये आम्ही एकत्र आलो. त्याने चित्रपटात जी ऊर्जा, करिष्मा, विनोद आणि मोहिनी आणली ती अतुलनीय आहे आणि ती जादू पुन्हा पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”
शाहरुख खान म्हणाला, “राज कुमार हिरानी हे या पिढीतील उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत, आम्ही नेहमी एकत्र काम करण्याबद्दल बोललो आणि मला खूप आनंद होत आहे की आम्ही ते ‘डंकी’ सोबत करत आहोत. आम्ही नुकतेच या महिन्यात शूटिंग सुरू केले आहे आणि मी त्यातील प्रत्येक क्षण जपत आहे. राजू के लिए …कुछ भी.
तर तापसी पन्नू म्हणाली, “मी या प्रवासाला सुरुवात करण्यास आणि या अतिशय खास चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी उत्सुक आहे. राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान या दोन व्यक्तींसोबत काम करण्याची माझी पहिलीच वेळ आहे, ज्यांचा मी मनापासून आदर करते आणि कौतुक करते.”
व्हिडिओमध्ये, SRK मुन्नाभाई M.B.B.S आणि संजू सारख्या चित्रपटांसाठी हिराणींची स्तुती करताना दिसत आहे आणि त्याच्याकडे त्याच्यासाठी काही स्क्रिप्ट आहे का ते विचारत आहे. हिरानी सकारात्मक उत्तर देतात आणि म्हणतात की चित्रपटात कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्स आहे. मात्र, या शीर्षकाचा अर्थ न समजल्याने खान हे शीर्षक पाहून हैराण झाल्याचे दिसत असून “Donkey…Dunki…क्या मालूम क्या बना रहा है पर ले लो ले लो” म्हणतांना दिसत आहे.
हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल आणि लवकरच फ्लोरवर जाईल.
@rajkumarhirani @taapsee @iamsrk