जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचे
कोणत्याही बँकेत अकाउंट नसलेला, दोन्ही खिसे रिकामे असलेला, जगातील सर्वात श्रीमंत माणूस या महाराष्ट्रात घडून गेलाय आणि तो म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब, साहेबांची श्रीमंती अफाट होती ती पैशात कधी मोजताच आली नसती आणि ती श्रीमंती म्हणजे त्यांना मानणारी माणसे, आणि याच माणसांनी त्यांना धर्मवीर ही उपाधी मोठ्या प्रेमाने दिली होती आणि साहेबांनी मूकपणे का होईना ती स्वीकारली होती.
‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ या प्रवीण विठ्ठल तरडे या अतिशय मेहनती अभिनेता/दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळेच त्यांचा हा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमधून प्रसाद ओकचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे.
अश्या लोकांच्या हृदयात घर करून राहिलेल्या व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणे हे प्रचंड जिकरीचे आणि त्यातही त्यांची व्यक्तिरेखा साकारणं हे त्याहूनही अवघड काम. परंतु या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे पेलण्याची जबाबदारी दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते प्रसाद ओक यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे.
दरम्यान, हा चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.