तिने ‘चिंचि चेटकीणी’ला तब्बल ११० वेळा पाहिले…
चिन्मय मांडलेकरचे दिग्दर्शन, वैभव मांगले चेटकीणीच्या भूमिकेत , राहुल भंडारे निर्माता मग काय बोलता ‘हाऊसफुल्ल’ च्या पाट्या लागल्या नसत्या तरच नवल, हो *अलबत्या गलबत्या* बद्दलच बोलतोय नुसता धुमाकूळ घातला या नाट्याने लहान मुलांनी तर नाटक डोक्यावर घेतलेच पण मोठ्यांनीही तोंड भरून कौतुक केले. खास करून या नाटकातील
‘चिंची चेटकिण’ चेटकीण असूनही हे पात्र मुलांना प्रचंड आवडले, आता पुन्हा ९ एप्रिल पासून ही ‘चिंची चेटकिण’आपल्या पुनःश्च भेटीला आली आहे.
तर या हव्याहव्याश्या चेटकीणीचे स्वागत करायलाच हवे नाही का!
आता हेच बघा न, अशीच एक आपली बालमैत्रिण *काव्या काणे* ९ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या पुणे बालगंधर्वच्या प्रयोगाला चिंची चेटकिणीला भेटायला आली, जीने या चिंची चेटकिणीचं *अलबत्या गलबत्या* हे नाटक एक नाही, दोन नाही तर तब्बल ११० वेळा पाहिलयं.
रंगभूमी आणि बालनाट्यासाठी असा बालप्रेक्षक लाभणे हि खरचं कौतुक आणि अभिमानाची गोष्ट आहे.
चिंचीच्या जादूची भुरळ अशीच राहो, आणि *अलबत्या गलबत्या* चे हजारो प्रयोग होवोत. अशी ईच्छा नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी ‘मुंबईन्यूज २४x७’ कडे व्यक्त केली.