स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ मालिकेत अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे यांची धमाकेदार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ मालिकेत अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे यांची धमाकेदार एण्ट्री

स्टार प्रवाहच्या ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत अभिनेत्री अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे यांची धमाकेदार एण्ट्री होणार आहे. नवे लक्ष्यच्या पहिल्या पर्वात म्हणजेच लक्ष्य मालिकेत रेणुका राठोड आणि सलोनी देशमुख या दोन्ही व्यक्तिरेखा खूप गाजल्या होत्या. त्यामुळे ही गाजलेली पात्र मालिकेत पुन्हा पाहायला मिळतील. यानिमित्ताने युनिट ८ आणि युनिट ९ एकत्र येऊन आठ वर्षांपूर्वींच्या केसचा गुंता सोडवणार आहेत. अभिनेत्री अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे जुनी भूमिका नव्याने साकारण्यासाठी सज्ज झाल्या असून नवे लक्ष्यच्या टीमसोबत काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

नवे लक्ष्यमधल्या या दमदार एण्ट्रीबदद्ल सांगताना अदिती म्हणाली, ‘मराठीत लक्ष्य आणि नवे लक्ष्य या मालिकेने नेहमीच पोलिसांची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला आहे. सलोनी देशमुख या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. इतक्या वर्षांनंतर तीच भूमिका पुन्हा साकारायला मिळणं ही आनंददायी गोष्ट आहे. माझ्यातल्या एनर्जीचा कस लागतोय. पोलिसांची वर्दी परिधान केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा संचारते. त्या वर्दीचा एक आब आहे. सलोनी हे पात्र माझ्या खूप जवळचं आहे. सेटवर गेल्यानंतर पडद्यामागच्या त्याच सर्व टीमला भेटून खूप आनंद झाला. सोहम प्रोडक्शनने नेहमीच माणसं जपली आहेत. त्यामुळे स्टार प्रवाहच्या या परिवारात पुन्हा सामील होताना खूप आनंद होतोय अशी भावना अदिती सारंगधरने व्यक्त केली.’

तर श्वेता शिंदेसाठी देखिल रेणुका राठोड हे पात्रं खूप जवळचं आहे. पुन्हा एकदा रेणुका राठोड साकारणं हे आव्हानात्मक आहे कारण यावेळेस मी कथानकात आई होणार आहे. त्यामुळे आईपणाची जबाबदारी पार पाडताना ती तिचं पोलिसी कर्तव्य कसं पार पाडते हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तेव्हा ‘नवे लक्ष्य’चे उत्कंठावर्धक भाग पाहायला विसरु नका दर रविवारी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns