“मी माझे मत बिलकुल बदलणार नाही, कारण माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला”- विक्रम गोखले

विक्रम गोखलेंच्या भाषणा नंतर समाजमाध्यमात एकच गदारोळ उठला, आज शुक्रवारी त्याबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेत विक्रम गोखलेंनी सांगितले की माझे भाषण पत्रकारांनी पूर्ण न दाखवल्याने हे घडले नाहीतर, माझे भाषण ऐकल्यानंतर कोणाची माय व्यायली आहे टीका करण्याची.

कंगना राणावत ही कोण मुलगी आहे तिच्याशी माझा काही संबंध नाही मी तिच्याबरोबर काम केलेले नाही मी तिला ओळखत देखील नाही.
तरीही कोणी तरी बोलतोय त्याची दखल घेणे त्यावर आवश्यकता असेल तर आपलं मत व्यक्त करणे हा माझा अधिकार आहे.

माझी तिच्याशी ओळख नसली तरी माझ्या राजकीय अभ्यासाची आणि माझी चांगली ओळख आहे, त्यामुळे तिच्या म्हणण्याला मी जो दुजोरा दिला त्यामागे माझीही काही कारणे आहेत असे मी जो म्हणालो ती कारण आता मी सांगत बसत नाही.
१८ मे २०१४ रोजीचा इंग्लंड वरून निघणारा गार्डियन पेपर वाचा त्या पेपरची कॉपी माझ्याकडे आहे. तुम्ही वाचून घ्या त्यामुळे कंगना काहीही चुकीचे बोलली नाही असे मी जे म्हणालो त्यावर लगेच ताबडतोब बोंबाबोंब झाली.
एक भारतीय नागरिक म्हणून माझी ओळख राजकीय अभ्यासक म्हणून आहे’ राजकीय विश्लेषक नाही. आणि म्हणून मी माझे मत बिलकुल बदलणार नाही आणि त्यामुळे ज्यांना मी काय बोललोय ( हे मूळ भाषणांमध्ये जे तुम्ही लोकांनी दाखवलेच नाही ) मी माझ्या मूळ भाषणामध्ये काय बोललो ? हे अश्रू ढाळणारे स्वातंत्र्यसैनिक आता जे म्हणता आहेत जे मला शिव्याशाप मला मिळत आहे, त्यांना कदाचित कळेल की विक्रम गोखले काय म्हणाले होते. आणि त्याचा विपर्यास कसा केला गेला. मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मी माझ्या मूळ भाषणांमध्ये हे म्हणलेलो आहे. त्याचा मतितार्थ असा “दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल” मग बाकीचे लोक ज्यांनी प्राण दिले फासावर लटकले, गोळ्या घातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांची अवहेलना झाली याबद्दल आपल्याला कोणालाही कसलीही शरम वाटत नाही त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. १८ मे २०१४ रोजी माझा भारत जागतिक राजकीय पटलावर एक सक्षम देश म्हणून उभा राहिला त्याने सुरुवात केली आहे याचा मला अभिमान आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मला कोणावरही लादायचं नाही आहे ते तुम्ही स्वीकारा न स्वीकारा तुमची मर्जी. मला जेव्हा प्रश्न विचारला गेला त्याच्यावर मी उत्तर दिले आहे यापेक्षा अधिक मला या विषयावरती बोलायचं नाही.
मुद्दा क्रमांक दोन ( थोड्याच वेळात )

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns