विक्रम गोखलेंच्या भाषणा नंतर समाजमाध्यमात एकच गदारोळ उठला, आज शुक्रवारी त्याबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेत विक्रम गोखलेंनी सांगितले की माझे भाषण पत्रकारांनी पूर्ण न दाखवल्याने हे घडले नाहीतर, माझे भाषण ऐकल्यानंतर कोणाची माय व्यायली आहे टीका करण्याची.
आर्यन आणि शाहरुखच्या बाबतीत मिडियावाल्यांनी नको त्या ठिकाणी आणि नको ते संदर्भहीन प्रश्न विचारायला सुरुवात केली अर्थात हे सगळे TRP वाढवण्याच्या दृष्टीने होते हे मला लगेच समाझले. त्यामुळे मी “नो कमेंट्स” असे उत्तर दिले. त्याच्यावर लगेच प्रश विचाराला सुरुवात करण्याची तयारी दिसत होती मला, म्हणून मी त्यांना म्हटले थांबा नो कमेंट्स का तर मी इनसिकुयर फील करत होतो का तर मी बॉलिवूड वर कॉमेंट्स करणार होतो.
माझ्यादृष्टीने आर्यन खान, शाहरुख खान आणि त्यांच्या संदर्भात जे काही चालू आहे ते अतिशय शुल्लक आहे. माझ्या भाषणाच्या संदर्भात मी बोलत आहे. ड्रग्ज या विषयाशी ते संबंधित आहे तेव्हा त्याविषयी ते महत्त्वाची आहे तो विषय नव्हता विक्रम गोखले यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त जे शब्द माझ्या तोंडात नाही त्याबद्दल प्रश्न विचारणे हा पहिला गुन्हा प्रेसचा आहे मीडियाचा आहे तो माझ्यावर आरोप केल्या सारखे आहे. प्रश्न खोडसाळ विचारू नका प्रॉपर विचार. त्यामुळे मी नो कॉमेंट मी असे उत्तर दिले ते काय कोणाला घाबरून वगैरे नाही शाहरुख काय आर्यन काय बॉलिवूडमधील कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही, करू शकला नाही आणि करायचा प्रयत्न केला तरी मी माझं नाव विक्रम चंद्रकांत गोखले असे लावतो मी दुसर्या कुणाच माझ्या बापाचं नाव म्हणून लावत नाही. तो फालतू विषय आहे त्यापेक्षा दोनच दिवसापूर्वी २१ वर्षाचा मुलगा दहशतवाद्यांची गोळी डोक्यात घेऊन मरतो तो माझा नायक आहे. शाहरुख आर्यन नाहीत हे माझं ठाम मत आहे मी माझ्या मतावर ठाम आहे राष्ट्राच्या संदर्भात विचार करताना अशा तऱ्हेचे खूप महत्वाचे विषय त्याच्यावरती मी विचार करत असतो.
” हा देश भगवाच राहील ” हे माझं वक्तव्य, माझा धर्मनिरपेक्षते वर विश्वास आहे जरूर आहे. धर्म ही घाणच आहे त्यामुळे धर्म बाजूला ठेवून लोकांनी जनतेनी सुसंवाद राखावा त्याच्यावर माझा विश्वास आहे अति बुद्धिजीवी, अति सुशिक्षित हे सगळे धर्मनिरपेक्ष लोक स्वतःला सेक्युलर समजतात ते सगळे खोटे आहे. मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये आणि ते पद्धतशीरपणे पेरले गेले आहेत समाजामध्ये. गेली कित्येक वर्ष तर या दांभिक धर्मनिरपेक्षते वर माझा कणभरही विश्वास नाही. जात पात आणि धर्म या अत्यंत नीच अशा घाणेरड्या गोष्टींनी आपला देश पोखरलेला आहे. हे सातत्याने मी म्हणत असतो आता आपले राष्ट्र आहे हिंदुस्तान भारत असे जे आपण म्हणतो याने आपली सो कॉल्ड धर्मनिरपेक्षता हे गेली कित्येक वर्ष जोपासण्याचे नाटक केलेले आहे त्यांचा मी राग करतो. यांच्यावर माझा कधीही विश्वास नव्हता विश्वास नाही आणि बसणार ही नाही.
मी तोंड फाटका माणूस आहे त्यामुळेच मला माझे ओठ ओढून घेता येत नाहीत. गेली ३२ वर्ष जे कुणी राजकीय पक्ष आहेत त्यांच्या कडून मला निरोप आलेले आहेत आमच्यात या पुढचे शब्द सांगतो रिपीट आमच्यात या तुम्हाला जे पाहीजे ते आम्ही देऊ तुम्ही आमच्यात या, कोणाकडे मी गेलेलो नाही मी ज्यांच्या बाजूनी बोलतो आहे असे सुडो सेक्युलॅरिझम तसेच पत्रकारांना वाटते आहे जे विरोधी पक्षात आहे त्यांच्याकरता सांगतोय की आत्ता ज्यांचे सरकार आहे त्यांच्या झालेल्या चुका सुद्धा थोबाडावर मारणारा, बोलणार मी आहे आणि तेही घरातील चार भिंतीच्या आत नाही तर लाखो करोडो लोकांच्या समोर, त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत, तुम्ही संधीसाधू पत्रकार आहात एखाद्या जनावराला ढोसून ढोसून कसं ढकलायचं, पण हे मी माझ्या बाबतीत होऊ देत नाही मी फडाफट बोलणारा माणूस आहे काही राजकीय पक्ष असे आहेत नावे घेत नाही मी त्यांची. ते ही तसलेच आहेत पण त्याच्यातील काही माणसे जी चांगली आहेत त्याच्या पाठीमागे मी करोडो हजारो लोकां समोर त्यांचे कौतुकच करतो
कारण जे चांगले आहे हे चांगली आहे, जे वाईट आहे ते फेकून द्या ! म्हणजेच जे चांगले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, तर हे झाले देश भगवाच राहील हिरवा होणार नाही हे माझ्या व्यक्तव्य वरचं स्पष्टीकरण.
भाजप आणि शिवसेना यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे त्याची गरज आहे.
दांभिक धर्मनिरपेक्ष लोकांना याची भीती वाटत आहे.
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून निवडणूक लढवली त्यांच्या निवडणूक नामावर लोकांनी विश्वास ठेवून त्यांना मत दिली मी ही त्यातील एक होतो मात्र निवडून आल्यानंतर ते वेगळे झाले पण माझ्या मते अजूनही वेळ गेलेली नाही फार विचित्र अशा कड्यावरती आपला देश उभा आहे हे मला माझ्या अभ्यासामुळे खात्री आहे, शंका नाही. म्हणूनच मी म्हणतो या दोन पक्षांनी एकत्र यावे हे मी माझे मत व्यक्त करत नाही तर मी प्रयत्नही करतो आहे.
सतेच्या लालसेपोटी ज्यांचा दर्जा नाही असे जे राजकीय पक्ष आहेत ते सतत भांडत राहतात मुख्य मुद्द्या पासून बाजूला नेतात आणि तुम्ही ते दाखवत राहतात करण वरून दांडके बसत असतात. माझे तरुण पत्रकार मित्र इथे त्यातील काही हजर आहेत त्यांनी मला विनंती केली होती माझ्या भाषणा नंतर सर जर तुम्हाला तुमची काही बाजू मांडायची असेल तर तुम्ही पहिले माझ्या वाहिनीला द्या, पण माझ्या मुलींनी व बायकोने मला सल्ला दिला कोणालाही एकाला इंटरव्ह्यू देऊ नका, द्यायचा असल्यास सगळ्यांना एकत्र द्या.
जे माझ्या बद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत गरळ ओकत आहेत त्यांचा बद्दल माझी काही तक्रार नाही मी त्यांची केयरच करत नाही कारण त्यांनी मी जे बोललो आहे त्याचा अभ्यासच केला नाही. त्यांनी अकलेशी शत्रुत्वच स्वीकारलेले आहे.
महात्मा गांधीचे नाव न घेता त्यांच्यावर टीका.
आपण जे बोललो ते त्यातील महत्वाचा भाग न दाखवल्या बद्दल मीडियावर राग व्यक्त केला.