गेली १५-१६ वर्षे नाट्यसृष्टीला सुपरहिट नाटकं देणारे अव्दैत थिएटरचे निर्माते राहुल मधुकर भंडारे यांच्या “अलबत्या गलबत्या” या नाटकाने अनेक विश्वविक्रम केले. नाटका सोबतच नाटकाचे आकर्षण ठरलेला नाटकाचा सेट देखील नाट्यक्षेत्रा सहित प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे
यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व थिएटर सहित नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे राहुल भंडारे यांनी अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या गोडाउन मध्ये कोळसा बंदर, काळा चौकी येथे ठेवला होता.
मात्र राहुल भंडारे यांचे असे म्हणणे आहे की तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरेश सावंत यांनी गोडाऊन मालकास खोटे सांगून गोडाऊन मधून चोरून श्रेयस तळपदे यांच्या OTT प्लॅटफॉर्म च्या ‘भक्षक’ या एकांकिकेच्या शूटसाठी वापण्यात आला.
महाराष्ट्रभर नाट्यगृह चालू ठेवण्यास मनाई असताना देखील लॉकडाऊन काळातील शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत, बेकायदेशीररित्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे ‘अलबत्याचा गलबत्या’ नाटकाचा सेट वापरून हे कमर्शिअल शूटिंगसाठी करण्यात आले असेही त्यांचे म्हणणे आहे.
‘अलबत्या गलबत्या’ या नाटका निवडीत सर्व प्रापर्टी, सेट, इ., हे अव्दैत थिएटर संस्थेची Intellectual property असून निर्माते राहुल भंडारे यांच्या परवानगीशिवाय वापरली असल्यामुळे हे शूटिंग कुठेही रिलीज करू नये अन्यथा Intellectual property rights अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा अर्ज शिवडी पोलिस स्थानकाला दिला आहे. असे राहुल भंडारे यांनी सांगितले.
निर्माते राहुल भंडारे यांचा तक्रार अर्ज शिवडी पोलिसांनी स्वीकारला असून पोलिसांन मार्फत अभिनेते श्रेयस तळपदे सोबतच सुरेश सावंत यांची चौकशी होणार आहे.
सोबतच शासनाचे लॉक डाऊनचे नियम मोडल्याबाबत त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही राहुल भंडारे यांनी आपल्या तक्रार अर्जात केली आहे.