सचिन चिटणीस……
चित्रपट हे विचारपूर्वक काम करण्याचे माध्यम असून कोणीही उठावं आणि चित्रपट बनवावा अशाने दर्जा राहणार नाही – वीरधवल पाटील, सिनेमॅटोग्राफर
नुकताच “गाभ” या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा संपन्न झाला यावेळेस बोलताना या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफर वीरधवल पाटील यांनी *MumbaiNews24x7* शी खास बातचीत केली.
मराठी चित्रपट चालत नाहीत मात्र हिंदी चित्रपट चालतात या विषयावर बोलताना वीरधवल म्हणाले मराठी सिनेमा चालत नाही याला संपूर्णपणे प्रेक्षक जबाबदार नसून फिल्म मेकर जास्त जबाबदार आहे. आजकाल काय होते रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाली व त्यातून जो पैसा मिळेल त्यातले 30 ते 40 लाख रुपये बाजूला काढून त्याच्या चित्रपट बनवा असं दिग्दर्शकांना सांगितले जात. कित्येक दिग्दर्शकांना काम हवे असल्या कारणाने ते 30 – 40 लाखात चित्रपट बनवण्यास तयार होतात मात्र त्या चित्रपटाचा दर्जा त्यामुळे खालावला जातो प्रत्येक बाबतीत कॉम्प्रमाईज करावे लागते.
हिंदी चित्रपटात काही वेळेस एका गाण्याची शूटिंग चार ते पाच दिवस चालते मात्र मराठीत एका दिवसात संपूर्ण गाणे चित्रित व्हायला हवे असे सांगितले जाते. अशाने जसे जमेल तसे शूटिंग केले जाते. म्हणूनच मराठी चित्रपट निर्मात्यांनी अंथरूण बघून हात पाय पसरायला हवे. तसेच फिल्म मेकर्सनी सरधोपट चित्रपट न बनवता विविध वेगळे प्रयोग करायला हवेत. साउथच्या चित्रपटांमध्ये जसे की लोक चित्रपटाद्वारे आपली संस्कृती दाखवतात तशी मराठी चित्रपटांमध्ये दाखवली जात नाही हे कटाक्षाने टाळले पाहिजे. चित्रपट बनवण्याचा व्यवस्थित अभ्यास करूनच चित्रपट बनवावयास घेतला पाहिजे तरच त्याचा दर्जा टिकून राहील फिल्ममेकर्स ना त्यांच्या चुका दाखवल्या गेल्या तर त्यांना ते आवडत नाही मग ते त्या माणसाला काम देत नाहीत. असे करायला नाही पाहिजे कारण सिनेमा हे विचारपूर्वक काम करण्याचे माध्यम आहे फिल्म मेकर्सनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की कुठे घेऊन चाललोय आपण मराठी सिनेमा.