नियामक मंडळाच्या विशेष बैठकीला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी १८ फेब्रुवारीला एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते
नियामक मंडळ सदस्यांची ही कृती घटनाबाह्य असल्याचे नमूद करत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी १८ फेब्रुवारीला होणाऱ्या नियामक मंडळाच्या विशेष बैठकीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती याबाबत मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. मंगळवारची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता मा.न्यायालयाने नियामक मंडळाच्या १८ तारखेला होणाऱ्या विशेष बैठकीला परवानगी दिली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns