“हा देश म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही” उद्धव ठाकरे

करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा आज सावरकर सभागृहात संपन्न झाला त्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे……

मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण हे सरकार पाडण्याच्या मागे आहेत पण मी आव्हान देतो की, हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा.

देश संकटात असताना भाजप राजकारण करत आहे हा देश म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही.

आम्ही गुळाला चिकटणारे मुंगळे नाही, मुंगळा कसा डसतो ते आम्ही दाखवू.

मी मुख्यमंत्री झाल्यापासून हा पहिलाच दसरा मेळावा आहे.

जो आमच्या वाटेत आडवा येईल त्याला आडवा करून छाताडावर पाय ठेवून गुढी उभी करून पुढे जाऊ.

विचारांचं सोनं घेऊनच आम्ही पुढे चाललो आहोत.

बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला.

औरंगजेबला या महाराष्ट्राच्या मातीने गाडला आहे.

मंदिर उघडली नाहीत म्हणून आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमच हिंदुत्व यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.

बाबरी पाडली तेव्हा कोण बिळात लपून बसले होते. आमचं हिंदुत्व हे बुरसटलेले नाही.

मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्याना बडवणारा हिंदू पाहिजे.

गाय मरो आणि माय जगो असे आमचे हिंदुत्व नाही.

गाय म्हणजे माता आणि तिथे जाऊन खाता.

गोवंश कायदा हा गोव्यात का नाही ?

शिवसेनाप्रमुख नसते तर मुंबई वाचली नसती.

काळया टोपी खाली डोकं असेल तर विचार करा.

हा दसरा मला भव्य करता आला असता पण मला माझ्या जनतेची काळजी आहे आणि आम्ही कायदा पाळतो.

जितकं लक्ष तुम्ही पक्षावर देत आहात ते लक्ष देशावर द्या.

३८ हजार कोटी हे केंद्राकडून महाराष्ट्राला येण बाकी आहे. असे असताना बाकी राज्यात मोफत लस वाटतं आहेत.

आमचा GST चा पैसा हा आमच्या हक्काचा आहे आणि केंद्र राज्याला देत नाही. मी इतर राज्यांना एकत्र येण्याचे आवाहन करतो.

जीएसटी जर फसली असेल तर पुन्हा जुनी प्रणाली अमलात आणा.

हा देश भाजपचा नाही. नितीश कुमार यांना मी शुभेच्छा देतो.

छत्रपतींकडून जर आपण काही शिकलो नाही तर त्यांचा जयजयकार करण्याचा अधिकार आपल्याला नाही.

छत्रपतींचे एक वाक्य आहे. होय मी शत्रूला दगा दिला आहे पण मी मित्राला दगा दिला असे एक तरी उदाहरण दाखवा.

मोहन भागवत यांना राष्ट्रपती करावे ही मागणी शिवसेनेची होती. आता त्यांना शिवसेना नकोशी झाली आहे.

नितीश कुमारांना सेक्युलर चेहरा पाहिजे होता म्हणून त्यांनी युती तोडली.

भेदभाव करून सरकार चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. एकाला विकत आणि एकाला फुकट.

दानवेजी बाप तुमचा असेल माझा बाप माझ्यासोबत माझ्या विचारांमध्ये आहे. मला भाडोत्री बाप नको तो तुमच्याकडेच ठेवा.

आहेराची पाकीट पळवणारे बाप तुमचे आहेत ते तुम्हाला लखलाभ असो.

काश्मीर भारतात परत आणणार असे मोदी म्हणाले होते काय झाले ?

मुंबई आणि महाराष्ट्राच मीठ खायचं आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करायची.

मराठी माणसाला भीक मागून नाही तर हक्काने खायला शिवसेनेने शिकवले आहे.

उद्योजकांना निमंत्रण देतो आहे महाराष्ट्र मध्ये उद्योग वाढवा. हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात तरुणांसाठी येत आहे.

भूमिपुत्रांना मी आवाहन करतो की, मला इथले तरुण उद्योगधंदे करताना दिसले पाहिजेत.

कोरोना च्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र पुढे जात आहे म्हणून बदनामी केली जात आहे. मुंबई पोलीस निक्कमे आहेत असे बोलले जात आहे.

मी पोलिसांचा देखील कुटुंब प्रमुख आहे त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही.

छातीवरती गोळी घेऊन अतिरेक्याला जिवंत पकडणारे जगात एकमेव मुंबई पोलिस दल आहे याचा मला अभिमान आहे.

महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये गांजाचे नाही तर तुळशी वृंदावन आहेत ही आमची संस्कृती आहे.

महाराष्ट्रात पाकव्याप्त काश्मीर असेल तर ते महाराष्ट्राचे नव्हे तर पंतप्रधानांचे अपयश आहे.

तोंडात गोमूत्र आणि शेण भरून आमच्यावरती गुळण्या केल्या. काय झालं ? आता ते तोंड घेऊन गप्प बसा.

महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करतो की सावध राहा. आम्ही महाराष्ट्राचा कारभार तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित करत आहोत.

मुंबईला महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. मुंबईचा लचका आम्ही असेपर्यंत तोडू देणार नाही.

तुमच्याकडे लाठीकाठी असेल आमच्याकडे तलवार पकडण्याचे मजबूत मनगट आहे.

जंगलाच संवर्धन करण्याचे काम हे या सरकारने केलं आहे.

कारशेड हलवण्यात आले आहे त्यामध्ये सरकारचा एक रुपया देखील गेलेला नाही.

अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही. इथे मर्द मावळ्यांच सरकार आहे.

मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आम्ही सांगितले की, युद्धाच्या काळात आम्ही राजकारण करणार नाही.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या खुर्चीचा विचारांचा पाया मजबूत पाहिजे.

एक दिवस असा दिवस येईल की जनता म्हणेल की कोणीही चालेल पण केंद्रात हे सरकार नको.

ओबीसी समाज, मराठा समाज, धनगर समाज, या सर्वांना मी सांगतोय की सर्वांना आम्ही न्याय देणार हे मी मुख्यमंत्री म्हणून सांगतो आहे.

सर्वांना आवाहन करतो की, कोणत्याही राजकारणाला बळी पडू नका.

बेलभंडारा घेऊन शपथ घेतो की महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असे मी काही करणार नाही.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns