मला आता बाहेर पडायचे आहे……

सचिन चिटणीस…..

“आम्हाला प्रेक्षकांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा नाही मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर प्रेक्षकांकडून पाठीवर विश्वासाची थाप हवी आहे.” असे भावनिक आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री लीना भागवत यांनी त्यांची संकल्पना व दिग्दर्शन असलेल्या ‘गं…. सहाजणी’ या माहितीपटा नंतर “मुंबई न्यूज 24×7” शी बोलताना केले.
गेले जवळजवळ चार महिने कोरोनाशी लढा देण्यासाठी लॉक डाउन पुकारण्यात आला होता. मात्र आता हळूहळू अनलॉक डाऊन सुरू होत असतानाच या संकटाशी सामना करण्यासाठी मला आता घराबाहेर पडायचे आहे असेच सांगत आपण या संकटाला धैर्याने तोंड दिले पाहिजे व योग्य ती काळजी घेतल्यास आपण नक्कीच या संकटातून बाहेर पडू असा विश्वास या माहितीपटातून देण्यात आला आहे.
“आज प्रत्येक क्षेत्राला या लॉकडाऊन मुळे मंदीची झळ पोचली आहे, त्याच प्रमाणे नाट्यक्षेत्र ही या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे जी नाटक हाऊसफुल जात होती त्यांचे बुकिंग शून्यावर आले आहे. या शून्यातूनच आपल्याला नवीन उभारीने व नवीन आशावाद घेऊन बाहेर पडायचे आहे” असे लीना भागवत म्हणतात.
या सर्व कारणांमुळेच लीना भागवतांना प्रेक्षकांकडून आशीर्वाद हवा आहे त्या म्हणतात ” प्रेक्षकांकडून आम्ही आर्थिक मदतीची अपेक्षा करत नाही मात्र आता जी नाटक येतील त्या नाटकांना प्रेक्षकांनी जरूर भरघोस पाठिंबा द्यावा जेणेकरून नाट्यक्षेत्रातील आम्हा सर्व लोकांना या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल. ”
या माहितीपटातील कलाकार आहेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुहिता थत्ते, लीना भागवत, सुप्रिया पाठारे, स्मिता सरवदे पौर्णिमा तळवलकर आणि शशांक केतकर.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns