पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे……
आधीपेक्षा आता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता.
तुम्ही अनंत कष्ट करून देशाला वाचवले.
कोरोनाच्या विरोधात भारताची लढाई मजबूत.
तुमच्या त्यागा मुळेच भारत कोरोनाशी लढतोय.
एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण कर्तव्य निभावतोय
जयंतीदिनी मी बाबासाहेब आंबेडकरांना नमन करतो.
आपल्या घरातल्या प्रत्येकाचा स्वास्थ्याची मी कामना करतो
परदेशातून येणार्यांचे आपण वेळीच अलगीकरण केले
अनेक सार्वजनिक स्थळे आपण तातडीने बंद केली.
भारताच्या तुलनेत इतर देशात कोरोना च्या केसेस 30 टक्के जास्त.
इतर देशांच्या तुलनेत भारत सध्या सुरक्षित.
नवे हॉटस्पॉट तयार होऊ देऊ नका.
पुढील आठवडाभर लॉकडाऊन कठोर.
जे प्रदेश 20 एप्रिल पर्यंत कोरोनाला आळा घालतील त्या ठिकाणी सशर्त शिथिलता देण्यात येईल.
सरकारकडून उद्या नवी नियमावली जारी करण्यात येईल.
या सप्तपदीचे पालन करा…
घरातील ज्येष्ठ, आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या.
लॉक डाऊन, सोशल डिस्टसिंगचे कठोर पालन करा.
कोरोनाशी दोन हात करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान करा.
गरिब जनतेला मदत करा.
कोणालाही कामावरून काढू नका.
आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार आपली इम्युनिटी वाढवा.
कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल ॲप डाऊनलोड करा.