मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील जनतेशी संवाद
परराज्यातील लोक महाराष्ट्रात सुरक्षित.
परराज्यातील लोकांची काळजी घेत आहोत, कोणीही राजकारण करून आग लावण्याचा प्रयत्न करू नये.
लोकांच्या भावनांशी कोणी खेळू नये.
कोणीतरी ट्रेन सुरू होणार याची अफवा पसरवली अफवा पसरविणाऱ्या वरती कारवाई होणार.
आपल्याकडे आगीचे बंब भरपूर आहेत पण ही आग मी पसरवू देणार नाही.
बाबासाहेबांच्या जयंतीदिनी भीमसैनिकांनी गर्दी न केल्याने त्यांना दिले धन्यवाद.
महाराष्ट्र सरकार कोरोनाशी खंबीरपणे लढा देत आहे.
10% कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले.
आता तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स.
लागण झालेले व लागण न झालेल्या रुग्णांचे आता वर्गीकरण होणार.
कोरोना नंतर राज्यापुढे आर्थिक संकट, आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी दोन टीम, अर्थतज्ञांची एक टीम कार्यरत होणार.
अनुभवी आणि तज्ज्ञ आर्थिक धोरण ठरवणार.
प्रत्येक वेळी महाराष्ट्राने संकटाच्या काळात महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे.
प्लाझमा ट्रीटमेंट बद्दल प्रयोग सुरू होणार, परवानगीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे.
ही वेळ राजकारण करण्याची नाही.
शेतमालाची दुकानं उघडी राहणार.
वैद्यकीय सेवा देणार्यांची गरज आहे.
तांदूळ सोबत आता डाळही देणार.