आईच्या गावात’ म्हणत ‘गर्ल्स’ रात्र फाट्यावर मारण्यासाठी तयार…..

‘आईच्या गावात’ म्हणत ‘गर्ल्स’ घालणार धिंगाणा पण म्हणजे गर्ल्स’ नक्की करणार काय? हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आईच्या गावात’ या गाण्यात ‘गर्ल्स’ धमाल करताना दिसणार असून, या गर्ल्स रात्र फाट्यावर मारण्या साठी तयार आहेत. विश्वास बसत नाही मग हे गाणे नीट ऐकाच. नेहमीच्या रटाळ दैनंदिन आयुष्यातून वेळ काढून ‘गर्ल्स’ स्वतःसाठी स्वछंदी आयुष्याचा आनंद घेताना दिसणार आहेत. मुलांसारखेच किंबहुना मुलांनाही हेवा वाटेल असे आयुष्य ह्या ‘गर्ल्स’ जगणार आहेत.

      ‘आईच्या गावात’ हे गाणे प्रफुल आणि स्वप्निल यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणं प्रफुल, स्वप्निल यांनी तब्बल तेरा वेळेस संगीतबद्ध केले. गाणं पूर्ण झाले की, गाण्यात काहीतरी अपूर्ण असल्याची भावना सगळ्यांना जाणवायची. पुन्हा नव्याने गाणे संगीतबद्ध केले जायचे असे तेरा वेळा झाले. अखेर चौदाव्या वेळेस सर्वांना अपेक्षित गाणे मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेत प्रफुल, स्वप्निल यांनी त्यांची जिद्द कायम ठेवत एकच गाणे चौदा वेळा संगीतबद्ध केले. या गाण्याच्या अनुभवाबद्दल प्रफुल आणि स्वप्निल सांगतात, “हे गाणं जेव्हा जेव्हा तयार झाले तेव्हा मनात काहीतरी राहतंय, अशी भावना येत होती. सरतेशेवटी आमच्या चौदाव्या प्रयत्नातून आम्हाला आमचे हवे असलेले गाणे मिळाले. या गाण्याला तयार करण्यासाठी बरेच दिवस लागले मात्र आम्ही दोघांनी आमची जिद्द आणि आमचे प्रयत्न सोडले नाहीत. मागच्या गाण्यात आपण कुठे कमी पडलो याचा विचार करून नवीन गाणे करत गेलो आणि गाणे तयार केले.”
‘आईच्या गावात’ या मंदार चोळकर यांच्या हटके शब्दांना प्रफुल आणि स्वप्निल यांनी संगीतबद्ध केले असून वैशाली सामंत, कविता राम आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केले आहे. या उडत्या चालीच्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले असून  विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित  ‘गर्ल्स’ हा सिनेमा २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

IPRoyal Pawns