– अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केली साडेनऊ तास कसून चौकशी.
– राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांच्या निवडीची जयंत पाटलांनी केली घोषणा.
– “जे जे शक्य होईल ते सर्व करणार” शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
– साक्री विधानसभा मतदार संघातील भाजपच्या बंडखोर अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचा शिवसेनेला पाठिंबा. शिवसेना ६२ वर.
– विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड.
– शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास पाठिंब्या बाबत विचार करू – पृथ्वीराज चव्हाण.
– काही नेत्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसचे नुकसान झाले – विजय वडेट्टीवार.
– शिवसेनेची भूमिका म्हणजे “विनाशकाले विपरीत बुद्धी” – सुधीर मुनगंटीवार.
राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती; अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर.
मीच मुख्यमंत्री, आदित्यला काय ते शिवसेना ठरवेल, सेनेला पाचही वर्ष मुख्यमंत्रीपद पाहिजे हे वाटू शकते, पण वाटणं आणि होणं यात फरक आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
– ‘जनसुराज्य शक्तीच्या’ विनय कोरेंचा भाजपला पाठिंबा.
– पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला असला तरी नवीन मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची शक्यता.