मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. ‘विकी वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून. या मुखवट्यामागे कोणता चेहरा लपलेला आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका आहे.
‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे या चित्रपटाची प्रस्तुती प्रणय चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्याने करत आहेत. ‘विकी वेलिंगकर’चे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून निर्मिती ‘जीसिम्स’, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी मुंबईत ‘विकी वेलिंगकर’चे पोस्टर प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे ‘मॅन’ कॅरेक्टर कधीच साकारले गेले नव्हते. ‘मास्क मॅन’ ही व्यक्तिरेखा या ‘विकी वेलिंगकर’च्या या कथेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. “ही कथा एका तरुणीवर बेतलेली असून ही तरुणी कॉमिक पुस्तक कलाकार आहे आणि ती घड्याळे विकते.
या चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक धक्के आणि वळणे आहेत. मंगळवारी प्रकाशित झालेल्या पोस्टरची टॅगलाईनसुद्धा ‘कुप्रवृत्ती मुखवट्यामागे लपू शकत नाही’ अशाच आशयाची आहे.