मुंबईतील जुहू विभाग इथे चित्रपटसृष्टीतील ८०% लोक राहतात, तिथलाच एक भंगारवाला त्याच्याकडे जमलेला रद्दीचा ढीग आणि त्या रद्दीत चक्क जगप्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकर साहिर लुधियानवी या प्रतिभावंत कलाकाराचा अनमोल असा साहित्य ठेवा सापडतो या सारखे दुसरे दुर्दैव्य ते काय!
या साहित्यात साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरात असलेली पत्रं, रोजनिशी, कविता आणि कृष्णधवल छायाचित्रे आदी गोष्टींचा समावेश आहे. ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’ या संस्थेला हा शब्दरत्नांचा ठेवा अवघ्या तीन हजार रुपयांत मिळाला आहे.
या साहित्याचे जतन करुन भविष्यात ती प्रसिद्ध करण्याचा या संस्थेचा मानस असल्याचे समजते.
+1
+1
+1
+1