काय! तुम्ही चप्पल किंवा सॅंडल घालून बाईक चालवत आहात, वेळीच सावध व्हा!

देशात नवीन वाहन नियम लागू करण्यात आले असून या नियमांचे तुम्ही पालन न केल्यास तुमच्या खिशाला जबर फटका बसण्याची शक्यता आहे.

नवीन आलेल्या नियमांमुळे वाहन चालकांत गोंधळाचे वातावरण असून वाहतूक विभागाने मात्र हे नवीन नियम काटेकोरपणे पाळावयास सुरवात केली आहे. काही जुने नियम सक्तीने लागू करण्यात येत नव्हते पण आता हे नियम सुद्धा पाळले जाणार असल्याने तुम्ही या पुढे गियरवाली बाईक चप्पल किंवा सॅंडल घालून चालवल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो, हो हे खरे असून वास्तविक हा नियम खूप जुना आहे मात्र तो नव्या आलेल्या नियमावली मुळे आता त्याचे पालन करावे लागणार आहे. तर चला, पायात बूट नसतील आणि तुम्ही बाईक चालवत असाल तर पाहिले बूट विकत घ्या मगच बाईक चालवायचा विचार मनात आणा!

नवीन नियम…..

– अधिकाऱ्यांचा आदेश न मानल्यास दोन हजार रुपये दंड

– ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड

– अपात्र असताना वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड

– भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक हजार रुपये दंड

– धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड

– दारु पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड

– ओव्हरस्पीड किंवा रेसिंग केल्यास पाच हजार रुपये दंड

– वाहन परवान्याचे नियम तोडल्यास 25 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

– वाहनात अतिरिक्त सामान भरल्यास दोन हजार रुपयांहून जास्त दंड

– वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रत्येकामागे एक हजार रुपये दंड

– सीटबेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड

– स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द

– हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द

– अँब्युलन्स, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास दहा हजार रुपये दंड

– इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवल्यास दोन हजार रुपये दंड

– अल्पवयीन पाल्याने गाडी चालवताना अपघात झाल्यास पालकांना तीन वर्ष तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणीही रद्द

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns