*’एक होतं माळीण’ नैसर्गिक आपत्तीवर आधारित पहिला मराठी चित्रपट*
*’एक होतं माळीण’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच*
*’एक होतं माळीण’ एका पावसात संपूर्ण गाव इतिहासजमा*
काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन गाडल्या गेलेल्या माळीण गावाचा थरार आता मोठ्या पडद्यावर येत आहे. २४ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीवर आधारित मराठीतील हा पहिला मराठी चित्रपट असून तो नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण कोंजे, दत्तात्रय गायकर, राजु राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शनचे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, पंकज म्हात्रे ,श्रीराम भगत, अक्षय म्हात्रे व राजु राणे यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजु राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजु राणे यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं असून अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी व हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कला नितेश नांदगावकर, व्हीएफएक्स रहमान अब्दुल्ला यांचे असून महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत.
सिनेमाची कथा ही पूर्णतः सत्य घटनेवर आधारित असून चित्रपटाचे दिग्दर्शन राजू राणे, दत्तात्रय गायकर यांनी या सिनेमासाठी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून योग्य माहिती घेऊन अचूक कथानक मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. माळीण गावचा सेट हा विशेष उल्लेखनीय आहे. चित्रपटाची दृश्ये हादरवणारी, थक्क व्हायला लावणारी आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधून त्या घटनेची दाहकता जाणवते. मात्र, केवळ गाव इतिहासजमा होते या घटनेच्या पलीकडे नातेसंबंध, प्रेम, मानवी भावभावना यांची मनाला भावणारी गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
*Trailer Link*





























