विक्रम गोखले अभिनित शेवटची कलाकृती “बेवारस – सत्य एका वळणावरचं” चित्रपटाचा टीजर लाँच

*विक्रम गोखले अभिनित शेवटची कलाकृती “बेवारस – सत्य एका वळणावरचं” चित्रपटाचा टीजर लाँच*

*कसदार अभिनयाची प्रेक्षकांना पर्वणी*

मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट असलेल्या “बेवारस – सत्य एका वळणावरचं” या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथानक, उत्तम स्टारकास्ट टीजरमध्ये दिसत आहे.२५ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.

हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित “बेवारस – सत्य एका वळणावरचं” या चित्रपटाची प्रस्तुती शिव आर्यन फिल्म्सनं केली आहे. या चित्रपटाची निर्मिती सौ.रिया कुमार, नितीन विचारे व शिव आर्यन यांची आहे, कथा विजय राणे आणि दिग्दर्शन विजय राणे व सौ. रिया कुमार यांचे आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शन नितीन विचारे, शिरीष लाटकर यांची पटकथा, संवाद लेखन, गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, शिर्षक गीत लेखन सौ. रिया कुमार व संगीत बिपलाब दत्ता यांचे आहे. यूजीन डिसोझा आणि योगेश कोळी यांनी छायांकन, अमीर हडकर यांनी पार्श्वसंगीत, यश सुर्वे यांनी संकलन , स्टार कास्टिंग नितीन विचारे यांनी केलं आहे. चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली आहे. पायाने अधू असलेल्या एका अनाथ मुलाचा कोर्टकचेरी संघर्ष याची कहाणी बेवारस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सामाजिक परिस्थितीचा पदरही या कथानकाला आहे. यात विक्रम गोखले यांच्या आर्त, भावनिक अभिनयाची झलक टीजरमध्ये दिसते. हृदयस्पर्शी कथानक, उत्तम स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना दमदार अभिनयाची पर्वणी मिळणार असल्याचा विश्वास टीजरमुळे निर्माण झाला आहे. लेखन, तांत्रिक बाजूंवरही चित्रपट सक्षम असल्याचं टीजरमधून जाणवत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.

*Teaser Link*

YouTube player

 

IPRoyal Pawns