चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २८ वा “सांस्कृतिक कलादर्पण २०२६”

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २८ वा “सांस्कृतिक कलादर्पण २०२६”

यंदाचा मानाचा… अन्..स्नेहाचा ….गौरव सोहळा प्रेमाचा…
“सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा” मंगळवार दिनांक २८एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या वेळी यंदाचा “सांस्कृतिक कलादर्पणचा” मानाचा सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ आणि ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र आवटी यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.
अंतिम निकाल पुढील प्रमाणे
*नाटक विभाग*
1) सर्वोत्कृष्ट नाटक प्रथम पुरस्कार ( गोष्ट तिच्या घटस्फोटाची – रंगनील )
2) सर्वोत्कृष्ट नाटक द्वितीय पुरस्कार ( फिल्टर कॉफी )
3) सर्वोत्कृष्ट नाटक तृतीय पुरस्कार ( लागली पैज )
4) लक्षवेधी नाटक ( ठरलंय Foreverr )
5) सर्वोत्कृष्ट पुरोज्जीवित नाटक पुरस्कार ( सविता दामोदर परांजपे )
6) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( राजन ताम्हाणे – गोष्ट तिच्या घटस्फोटाची )
7) सर्वोत्कृष्ट लेखक विभागून *( नरेश नाईक गोष्ट तिच्या घटस्फोटाची) *(हर्षद कठापूरकर – लागली पैज)
8) सर्वोत्कृष्ट अभिनेता ( संग्राम समेळ – गोष्ट तिच्या घटस्फोटाची)
9) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( मयुरी देशमुख )
10) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ( सुनील गोडसे – रणरागिणी ताराराणी )
11) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ( सुप्रिया विनोद – लागली पैज )
12) सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना ( शीतल तळपदे – सविता दामोदर परांजपे )
13) सर्वोत्कृष्ट नेपथ्य ( संदेश बेंद्रे – गोष्ट तिच्या घटस्फोटाची )
14) सर्वोत्कृष्ट रंगभूषा ( राहुल सुरते – रणरागिणी ताराराणी )
15) सर्वोत्कृष्ट वेशभूषा ( लक्ष्मण गोल्लार – फिल्टर कॉफी )
16) सर्वोत्कृष्ट संगीत ( अनिरुद्ध निमकर – ठरलंय Foreverr )
17) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ( निनाद म्हैसाळकर – सविता दामोदर परांजपे )
18) सर्वोत्कृष्ट विनोदी कलावंत ( कुणाल मेश्राम )
19) लक्षवेधी अभिनेत्री ( आदिती देशपांडे – गोष्ट तिच्या घटस्फोटाची )
20) लक्षवेधी अभिनेता ( विराजस कुलकर्णी – फिल्टर कॉफी)
21) प्रथम पदार्पण ( रुमानी खरे लागली पैज )
22) सर्वोत्कृष्ट बालकलाकार ( स्कंदा गांधी – अंजू उडाली भुर्रर्रर्र )

*प्रायोगिक नाटक*
1) सर्वोत्कृष्ट नाटक ( इथेच टाका तंबू )
2) लक्षवेधी नाटक ( ऊन पाऊस )
3) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( कल्पिता राणे – कुलविंद बक्षी सिंग – कर्ण )
4) सर्वोत्कृष्ट अभिनेता ( ओंमकार गोवर्धन – इथेच टाका तंबू )
5) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( अश्विनी कासार – इथेच टाका तंबू )
6) सर्वोत्कृष्ट लेखक ( दत्ता पाटील – इथेच टाका तंबू )
7) सर्वोत्कृष्ट नेपथ्य ( सुमित पाटील – ऊन पाऊस)
8) सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना ( चेतन ढवळे – कर्ण )
9) सर्वोत्कृष्ट संगीत ( भूषण भावसार – कर्ण )
10) लक्षवेधी अभिनेत्री ( योगिता तांबे – ऊन पाऊस )
11) लक्षवेधी अभिनेता ( उमेश जगताप – इथेच टाका तंबू )

*मालिका विभाग*
1) सर्वोत्कृष्ट मालिका ( लक्ष्मी निवास – झी मराठी )
2) लक्षवेधी मालिका ( लग्नानंतर होईलच प्रेम – स्टार प्रवाह )
3) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( विठ्ठल डाकवे – दामिनी २ )
4) सर्वोत्कृष्ट अभिनेता ( विजय आंधळकर – लग्नानंतर होईलच प्रेम )
5) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागून ( १- अक्षया देवधर – लक्ष्मी निवास , २- शिवानी सोनार – तारिणी )
6) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ( ऋजुता देशमुख – लग्नानंतर होईलच प्रेम )
7) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ( तुषार दळवी – लक्ष्मी निवास )
8) सर्वोत्कृष्ट खलनायक विभागून ( १- रुपाली भोसले – लपंडाव, २- मिलिंद गवळी – वचन दिले तु मला )
9) सर्वोत्कृष्ट कथा ( शशांक सोळंकी – वचन दिले तु मला )
10) लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम ( लागे कीर्तनाची गोडी – सन मराठी )

*चित्रपट विभाग*
1) सर्वोत्कृष्ट चित्रपट ( आदिशेष )
2) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( रमेश मोरे – आदिशेष )
3) सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागून ( सुबोध भावे – सकाळ तर होऊ द्या, अजिंक्य देव – तु मी आणि अमायरा, नारायण जाधव – गमन )
4) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( मानसी नाईक – सकाळ तर होऊ द्या )
5) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विभागून ( १- आराधना देशपांडे आदिशेष, २- राजश्री पोतदार – एप्रिल मे 99 )
6) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ( अरुण नलावडे – आदिशेष )
7) सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री ( ईशा डे – गुलकंद )
8) सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता ( समीर चौघुले – गुलकंद )
9) प्रथम पदार्पण ( साजिरी जोशी – एप्रिल मे 99 )
10) प्रसाद खानोलकर ( भेरा )
11) सर्वोत्कृष्ट पटकथा ( अमरजित आमले – कुर्ला टू वेंगुर्ला )
12) सर्वोत्कृष्ट संवाद ( सचिन मोटे – गुलकंद )
13) सर्वोत्कृष्ट छायांकन ( अपूर्वा शाळीग्राम – एप्रिल मे 99 )
14) सर्वोत्कृष्ट संकलन ( सुबोध नारकर – नयन )
15) सर्वोत्कृष्ट गीतकार ( रविकिरण जावीर – फुला )
16) सर्वोत्कृष्ट संगीतकार ( समाधान आयवळे – फुला )
17) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ( रोहित राऊत – गुलकंद )
18) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ( वैशाली सामंत – फुला )
19) सर्वोत्कृष्ट रंगभूषा ( रविंद्र जाधव – छबी )
20) सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक ( निलेश रसाळ – रिलस्टार )
21) लक्षवेधी चित्रपट ( फुला )
22) प्रेक्षक पसंती चित्रपट ( एप्रिल मे 99 )

23) कलागौरव पुरस्कार ( राज मिसाळ )
24) फेस ऑफ द इयर ( जान्हवी किल्लेकर )

*पत्रकारिता विभाग*
1) सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल ( ABP माझा )
2) सर्वोत्कृष्ट स्त्री वार्ताहर ( अनुजा धाक्रस – मुंबई तक )
3) सर्वोत्कृष्ट पुरुष वार्ताहर ( वेदांत नेब – ABP माझा )
4) सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम ( राजीव खांडेकर – माझा कट्टा – ABP माझा )
5) सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक ( फराह खान – न्यूज 18 मराठी )
6) सर्वोत्कृष्ट पत्रकार ( प्रवीण मुळ्ये – महाराष्ट्र टाइम्स )

IPRoyal Pawns