चित्रपटसृष्टीला व मराठी नाट्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळणार – उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत
चित्रपटसृष्टीला व मराठी नाट्यक्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगाचा दर्जा देण्याचे ठरले असून 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असून त्याची घोषणा करणार असल्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मुंबई न्यूज २४x७ शी बोलतांना सांगितले.