मुंबई लॉकडाउन, राज्यात १४४ कलम लागू

मुंबई लॉकडाउन, राज्यात १४४ कलम लागू, गरज पडल्यास ३१ मार्च नंतरही वाढवण्यात येईल.
५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
राज्यात सर्व प्रकारच्या लोकल, एसटी, खासगी बस आज रात्रीपासून पूर्णपणे बंद.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लोकल एसटी, खासगी बस आज रात्रीपासून पूर्णपणे बंद. नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

 

*सर्वसामान्यांसाठी लोकल बंद*

आज सकाळी ६ वाजल्यापासून ३१ मार्चपर्यंत लोकल प्रवासावर निर्बंध लागू केले गेले आहेत. यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेश द्वारावर पथक नियुक्त करण्यात आले असून. या पथकात GRP (रेल्वे पोलीस) – १, राज्य पोलीस -१ महसूल विभागाचा प्रतिनिधी -१ आणि एक वैद्यकीय कर्मचारी आहे. दरम्यान, ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे, अशांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलीय. तर, लांब पल्ल्याच्या गाड्या चालूच राहणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे ज्यांना एक्सप्रेसने जायचं आहे, त्यांनाही रेल्वे स्थानकावर तिकीट दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.

——————————- //————————————

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

*आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४* *कलम लागू*

आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.

जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.

महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.

रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.

जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील

अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील

बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील

शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.

आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.

ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.

चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.

३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल

सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद

अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती

पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns