मुक्ताईची ‘माऊली’ या सुवर्णक्षणांचे साक्षीदार
“राम कृष्ण हरि”
आपल्या महाराष्ट्राला संगीताचा जो महान वारसा पूर्वापार लाभला आहे, त्यातलं वारकरी संगीताचं योगदान फार मोलाचं आहे. त्यामुळे ही मौल्यवान परंपरा जपत *संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई* या चित्रपटात तब्बल १२ अभंगांची योजना करण्यात आली आहे.
हे संगीत सगळ्या महाराष्ट्राचे आहे. आणि महाराष्ट्र पांडुरंगाच्या पायी. हे संगीताचे *दि. १२ एप्रिल २५* रोजी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर येथे लोकार्पण करण्यात आले. या भव्य कार्यक्रमात आपल्याला अनेक संत भेटले. चांगदेव प्रकटले, ७ नामवंत गायकांच्या सुरातून साकारणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचे प्रेक्षक साक्षीदार झाले.
मुक्ताईची ‘माऊली’ या सुवर्णक्षणच जणू साजरा झाला.
*|| पंढरीनाथ महाराज की जय ||*

