‘ दंगल ‘ गर्ल सुहानी भटनागरचे १९ व्या वर्षी निधन

अभिनेता आमिर खान याचा सुपरहिट चित्रपट ‘दंगल’मध्ये बबिता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी निधन झाले.

सुहानी भटनागर फरिदाबादच्या सेक्टर 17 मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, चुकीच्या उपचारांमुळे सुहानी भटनागरचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारासाठी ती घेत असलेल्या औषधांच्या रिअॅक्शनमुळे सुहानीची तब्येत आणखीनच खालावली होती. शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी तिचा मृत्यू झाला. सुहानीच्या पार्थिवावर आज (दि. १७) सेक्टर-15 फरीदाबाद येथील अजरौंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुहानीच्या निधनानंतर आमिर खान याने आपल्या सोशल मीडियावर लिहिले आहे की, “सुहानीच्या निधनाच्या बातमीने आम्ही दुःखी आहोत. संपूर्ण कुटुंबाप्रती आम्ही शोक व्यक्त करतो. सुहानी खूप हुशार मुलगी होती, ती नेहमीच टीम प्लेयर म्हणून काम करायची. सुहानी तू नेहमी आमच्या हृदयात एक तारा राहशील.”

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns