राज ठाकरे यांची विराट सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथून केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाचा वाद सुरू असताना वेदना होत होत्या
आत्ताच विधानसभेच्या निवडणुका घ्या, फैसला होऊन जाऊदेत
एकनाथ शिंदे यांना एकच सांगणं आहे महाराष्ट्रासाठी काम करा
एकदा माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, सुतासारखा सगळा महाराष्ट्र सरळ करेन
मनसे संपलाय अशी टीका ज्यांनी केलीय त्यांची आज अवस्था काय… ; राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
बाळासाहेब असते तर शिवसेना फुटली नसती, राजकारण घरात झालं आणि बाहेरही झालं
उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची आणि बाळासाहेबांची भेट होऊ दिली नाही
मी शिवसेनेतून बाहेर जावं हीच उद्धव ठाकरे यांची इच्छा
शिवसेना म्हणजे शिवधनु्ष्य… बाळासाहेबांना सोडून कुणालाही झेपणार नाही, म्हणून शिवसेनेतून बाहेर
माहिमच्या समुद्रात दुसरं हाजी अली उभारलं जातंय लक्ष आहे का?
माहिमच्या समुद्रातील दर्गा जर तोडला नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करणार; राज ठाकरे
राज्य सरकारने मशिदीवरील भोंगे काढावे किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करावं, आम्ही काढतो
पाकिस्तानात जाऊन त्यांना खडे बोल सुनावणारे जावेद अख्तर यांच्यासारखे मुस्लिम मला हवेत
हे अलिबाबा आणि ४० चोर, महाराष्ट्रात लूट करुन सुरतेला गेलेले हे पहिलेच; राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला