“स्वत: च्या बापाच्या नावान मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“स्वत: च्या बापाच्या नावान मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले” आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला.
“गद्दारांना परत शिवसेनेत घेऊ नका,” अशी मागणी कार्यकारिणीने उद्धव ठाकरेंना केली. यावर “त्यांना परत घेणारच नाही” असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
“शिवसेना निखारा आहे. त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू” असा इशारा देखील पक्षप्रमुखांनी यावेळेस गद्दारांना दिला.
या कार्यकारिणीत महत्वाचे ठराव पास करण्यात आले, ते असे –
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असे ठरवले असल्याचे
वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठरावाला अतिशय महत्त्व आहे.
निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना, पहिला
ठराव पारित, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक.
शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई
करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष
प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे असा ठराव ही या
बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव शिवसेना
नेते संजय राऊत यांनी मांडला होता.
त्याशिवाय, बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व
अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या
ठरावामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून आता
बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी
अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे.
मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार
नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.