वटपौर्णिमा ही खरच अंधश्रद्धा आहे?

वटपौर्णिमा ही खरच अंधश्रद्धा आहे?

*वटसावित्री*!
*वटसावित्रीची पौर्णिमा* *अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही*.
माझा विज्ञानावर विश्वास आहे, अंधश्रद्धेवर नाही
*विज्ञाननिष्ठा म्हणजे काय*?

तर विज्ञाननिष्ठा म्हणजे *कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे*?
वाटपौर्णिमेला *वडाचीच पूजा का करायची*? *आंबा, फणस, जांभूळ* वा *बाभळीची का नाही*?

बरं *ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची* *श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही*
*हे काहीच माहिती नसतांना वाटपौर्णिमेला ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता*?

*जगात सर्वात दाट सावली असते वडा ची*. वडाच्या *पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते*. त्यामुळे *वडाखालील जमीन सदैव ओलसर असते*. याचसाठी *वडाची सावली अद्भुत गुणकारी* आहे.
*अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते*.
*वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य काय आहे, तर जगात *सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणजे वड*.

*ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला*. *गरमीने त्रासला*. *प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले*.
*त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात* आणि *उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले*. हे आहे *पतीचे प्राण वाचविणे*. *बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:*
*ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे म्हणजे वटपौर्णिमा*!

*याचा सात जन्मांशी संबंध काय?*
तर ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट.
*सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही*. हा *जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे*.
*जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात*. *जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.*
*संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे.* म्हणून *तर ‘तप’ १२ वर्षे*. *नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या*.
*१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात*. *जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी.* *नवा देह*.

*असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे*. पूर्वी *विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे*!’ अर्थात *पती १६+८४=१०० वर्षे जगू देत*.

*शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे*. *वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला*.
*आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय*? *याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा*!’

तर यापुढे वाटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पुजा करत असतील तर त्यांच्या या कृतीला हसू नका कारण तुमच्या पेक्षा त्या जास्त विज्ञाननिष्ठ आहेत.

+1
0
+1
0
+1
1
+1
0
IPRoyal Pawns