पहिला लता मंगेशकर पुरस्कार सोहळा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार
देवेंद्र फडणवीस सुभाष देसाई लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यासाठी षण्मुखानंद सभागृहात उपस्थित
पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल उपस्थित
हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात अनुपस्थित
हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात आदिनाथ मंगेशकर
निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोहळ्याला अनुपस्थित आदित्य ठाकरे यांनी केले मोदींचे स्वागत
डॉक्टर हरीश भिमानी यांनी जागवल्या लता मंगेशकर यांच्या आठवणी
आशा भोसले तसेच उषा मंगेशकर उपस्थित
उषा मंगेशकर मी लहान गायिका आहे वक्ता नाही लता मंगेशकर यांच्या नावाने मिळणारा पहिला पुरस्कार आपण स्वीकारला याबद्दल मंगेशकर कुटुंबीय आपले आभारी आहे लता दीदी तेरा वर्षापासून आमचे बाबा झाली. आज आम्ही असे मानतो आहे की दिदी या समारंभाला साकार रूपांमध्ये नसली तरी हजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी – संगीत एक साधना व भावनाही आहे जे व्यक्त करते ते शब्द. भाव आणि भावना भरते ते संगीत आहे. आपण नशीबवान आहोत की संगीताच्या त्या सामर्थ्याला लतादीदींच्या रुपात बघितले आहे. लतादीदी माझी मोठी बहीणच होती. बहिणीच्या रुपात मला त्यांच्याकडून अपार प्रेम मिळालेले आहे. या रक्षाबंधनला मात्र दीदी नसेल. सुधीर फडकें मुळे माझी लता मंगेशकरां बरोबर ओळख झाली. लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारणे हे माझ दायित्व आहे. हा पुरस्कार मी सर्व माझ्या देशवासियांना समर्पित करतो. ज्याप्रमाणे लतादीदी सर्व लोकांची होती त्याप्रमाणे हा पुरस्कार सर्व लोकांसाठीचा आहे. लतादीदी नेहमी म्हणायची मनुष्य आपल्या वयाने नाही तर कार्याने मोठा होतो. लतादीदी वयाने मोठी होती तसेच कर्माने देखील मोठी होती. दीदींनी संगीतात असे स्थान निर्माण केले की लोक लतादीदींना सरस्वती माँ म्हणू लागले. सरस्वतीच प्रतिरूप म्हणजे लतादीदी. लतादीदींना भारतरत्न हा पुरस्कार देऊन देश गौरंवीत झाला. संगीताची साधना व ईश्वराची साधना लतादीदींनी साठी एकच होती. त्या जेव्हा गाण्याच्या रेकॉर्डिंग ला जात असत तेव्हा चप्पल बाहेर काढून जात असत. ईश्वराचा विचार सुद्धा स्वर या अक्षरा शिवाय अधुरा आहे. संगीताबरोबरच राष्ट्रभक्तीची चेतना लतादीदी मध्ये होती हे त्यांच्या वडिलांमुळे होते लतादीदी तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत.
लतादीदींच्या आठवणीत आशाताई भावुक…
आशा भोंसले – या स्टेज वर मी दरवेळेस गाण्या करता आली होती पण आज हे माहिती नव्हतं की लतादीदी साठी यावं लागेल. गळ्यात सरस्वती, बुद्धीत चाणक्य, कुठे बोलायचं काय बोलायचे हे तिला बरोबर माहिती होतं. दीदी मला हभ या नावाने हाक मारायची हभ म्हणजे डोक्याने कमी. प्लेबॅक सिंगर यांचे रेकॉर्ड वर नाव देण्याची प्रथा लतादीदींन च्या आग्रहाने सुरू झाली.
तदनंतर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले याप्रसंगी बोलताना पुरस्कारप्राप्त सन्माननीय
राहुल देशपांडे ( संगीत) – हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या आजोबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलाय अशी भावना मनात व्यक्त होत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी माझ्या आजोबांना संगीतातील जो वारसा दिलेला आहे तो मी पुढे सुरू ठेवलेला आहे.
संज्या छाया ( उत्कृष्ट नाट्य निर्मिती )दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी – हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या सर्व टीमचा आहे.
उल्हास मुके ( डबेवाला संघटना अध्यक्ष ) – एकशे बत्तीस वर्षाची परंपरा असलेले हे सामाजिक कार्य माझे एकट्याचे नसून सर्व डबेवाल्यांचे आहे.
जॅकी श्रॉफ ( हिंदी सिनेमा ) मी लतादीदी व आशाताईंचा खूप मोठा फॅन असून या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, यापुढे मला भान ठेवून काम करावे लागेल.
आशा पारेख ( हिंदी सिनेमा ) लतादीदी, आशाताई व उषा मंगेशकर या तीन बहिणींच्या गाण्यांमुळे मी स्टार झाले.