सचिन चिटणीस…..
बिनधास्त, बेधडक, वेगळ्या विषयावरील चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक मिलिंद कवडे हे आपल्या नवीन चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी व अनुभवण्यासाठी सध्या दुबई मुक्कामी आहेत ते सध्या ट्रॅव्हल्स वर आधारित चित्रपटाची कथा लिहीत असून त्यातील नायक हा एक ब्लॉगर आहे व तो ब्लॉग लिहिण्यासाठी जगभर फिरत आहे त्याच्या जीवनात या ब्लॉग मुळे काय काय घडते किंवा घडणार आहे हे स्वतः अनुभवण्यासाठी लेखनाबरोबरच त्या गोष्टीचा अनुभव स्वतः मिलिंद कवडे दुबई स्थळांची विशेष व ज्यांना अधिक ज्ञात नाही अशी माहिती आपल्या मिलिंद कवडे फिल्म मेकर व्लॉग यावर देत आहेत.
त्यांचा पहिला व्लॉग होता बुर्ज खलिफा वर तर आज आलेला व्लॉगचे नाव आहे दुबई फ्रेम वर्ल्ड लार्जेस्ट फ्रेम इन डेप्थ टूर, जगातील सर्वात मोठी फ्रेम व सर्वात मोठी फोटो फ्रेम बद्दल मिलिंद कवडे या व्लॉगर मध्ये माहिती देताना दिसत आहेत तसेच ते या व्लॉग मध्ये असे म्हणतात “मी तुम्हाला हळुच सांगतोय कोणी ऐकलं तर मला जेलमध्ये टाकतील हे जे दुबई फ्रेम आहे ते चोरी केलेले डिझाईन आहे. दुबईतील मेट्रोबाबत बोलताना मिलिंद कवडे सांगतात एक-दोन वेळा तर मी लेडीज डब्यात घुसलो कारण गाडीवरील साईन बोर्ड इतके लहान आहेत की ते एकदम जवळ गेल्याशिवाय दिसत नाहीत या डब्यांवर ती लेडीज, जेन्ट्स, सिल्वर, गोल्ड, सामान्य माणूस अशी कंपार्टमेंट आहेत.
यावेळेस माझा चित्रपट हा ट्रॅव्हल्स वर आधारित आहे व यातील माझे कॅरेक्टर हा ब्लॉगर आहे व तोच अनुभव घेण्यासाठी मी हा व्लॉग करत आहे यातील माझा ब्लॉगर हा जगभराच्या प्रवासाला निघाला असून त्याला काय अनुभव येऊ शकतात हे मला बघायचे होते व यामुळे ते जाणवले व म्हणूनच माझे लिखाण अधिक मजबूत झाले जे मुंबईत बसून कदाचित झाले नसते.