अभिनेत्री सोनाली खरेच्या वॉव विथ सोनाली युट्यूब चॅनेलने केला २५ हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा पार’

अभिनेत्री सोनाली खरेचा फिटनेस व्हिडीओ आणि योगा नेहमीच फॅन्सना पसंतीस पडत असतात. म्हणूनच दोन वर्षापूर्वी सोनाली खरे वॉव विथ सोनाली (वर्ल्ड ऑफ वेलनेस विथ सोनाली) हे युट्युब चॅनेल घेऊन आली. ज्यामध्ये दिलेल्या फिटनेस टिप्स प्रेक्षकांना पसंतीस पडल्या. सोनाली खरेच्या या चॅनेलने २५ हजार सबस्कायबर्सचा टप्पा पार केला आहे.
युट्यूबवर वेगवेगळ्या विषयांचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, फिटनेस टिप्स हा तरुणांचा आवडीचा विषय आहे आणि तोच धागा पकडून हा चॅनेल सुरु केला. यातील खरे बोल हा कार्यक्रम चांगलाच गाजला. कलाकार फिटनेससाठी काय करतात हे या कार्यक्रमातून लोकांना कळले. यासाठीही अनेक मराठी कलाकार या चॅनेलवर येऊन गेले आहेत. या चॅनेलवर आत्तापर्यंत अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, पूजा सावंत, प्राजक्ता माळी अशा अभिनेत्रींपासून वैभव तत्ववादी, ललित प्रभाकर, भूषण प्रधान, शिव ठाकरे असे सेलिब्रिटी येऊन गेले आहे
आगामी काळात या युट्यूब चॅनेलवर अनेक प्रयोग पाहायला मिळणार आहेत. तसेच कलाकारांशिवाय इतर क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा फिटनेसही पाहायला मिळेल. याबद्दल सोनाली म्हणते,
‘’पहिल्या पासून माझा हेल्थ आणि फिटनेसकडे ओढा आहे. योगा- जीम हे सगळं मी नियमीत करतंच आले आहे. अभिनय तर आपण करतोच, आपलं ते काम आहे. पण त्याव्यतिरिक्त काही करता येईल का ? असा मी विचार केला. फिटनेसबद्दल मराठीत जास्त काही केलं नाही आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना आली की, युट्युब हे प्रभावी माध्यम आहे. त्याचा वापर करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिटनेसचा हा विषय पोहचवावा. स्वतःला फिट ठेवण्यासाठी कलाकार व्यायम तर करतातच आणि त्याचे सोशल मिडीयावर व्हिडीओ शेअर करत असतात. पण, दिवसभरात हे कलाकार व्यायाम, डाएट याचा मेळ कसा घालतात किंवा मी माझा फिटनेस कसा ठेवते ? हे सर्व, अशा सोशल माध्यमातून लोकांपर्यंत पोहचावा असा विचार मला आला. त्यासाठी वर्ल्ड ऑफ वेलनेस विथ सोनालीचा विचार आला आणि हे युट्यूब चॅनेल सुरु केलं. त्यानंतर मी सहकलाकारांकडून ते त्यांच्या फिटनेससाठी काय करतात हे खेळीमेळीने काही गेम्स खेळत जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद मिळालाय, लोकांना हे व्हिडीओ आवडतायत. वेगवेगळ्या कलाकारांची नाव सुचवली जात आहेत आणि आम्ही खूप प्रयत्न करतो की त्यांना आमच्या कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल. आता २६ एपिसोड्स पूर्ण झालेत आणि आणखीन नवनवीन यात काही करता येईल का याचा आम्ही विचार करतो आहे. यात माझ्या टीमने मला खूप मदत केली. आत्तापर्यंत २५  हजार सबस्काईबर्सचा टप्पा पार केला आहे याचा आनंद आहे. पण, अजून बरंच काम करायचं आहे.’

सोनालीने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत काम केले आहे. आभाळमाया, बेघुंद मनाच्या लहरी, ऊन पाऊस, बे दुणे दहा या मालिका तसेच, तेरे लिए, सावरखेड-एक गाव, चेकमेट, अँड जरा हटके, हृदयांतर हे सिनेमा तसेच नुकतीच गाजलेली अनुराधा वेबसिरीज या सोनालीच्या प्रसिद्ध कलाकृती आहेत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns