“चार आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी भारावून गेलोय, हा सन्मान माझ्यासाठी स्वप्नवत आहे” – अभिनेता शुभंकर तावडे

अभिनेता शुभंकर तावडे एक उत्तम अभिनेता आहे. हे त्याने आपल्या वेगवेगळ्या कलाकृतींनी सिध्द केले आहेच. पण आता त्याच्या सर्वोत्तम अभिनयावर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटलीय. ‘८ दोन ७५’ ह्या चित्रपटातल्या त्याच्या उत्तम अभिनयासाठी त्याला चार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत.

इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता, ड्रुक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता आणि बिरसामुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेता अशा चार फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कारांनी त्याचा गौरव झाला आहे.

सुत्रांच्या अनुसार, शुभंकरला अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यामुळेच तर आपल्या पदार्पणातल्या कागर सिनेमातच त्याने सर्वोत्कृष्ठ कामगिरी करून फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता. आता ‘८ दोन ७५’ फिल्ममधल्या त्याच्या कामगिरीचाही प्रत्येक फिल्म फेस्टिवलमध्ये विशेष उल्लेख केला गेला आहे. ही नक्कीच त्याच्यासाठी अभिमानाची बाब आहे,

अभिनेता शुभंकर तावडे म्हणतो , “आपला अभिनय देश-विदेशातल्या सिनेरसिकांनी पाहावा, ही सुप्त इच्छा प्रत्येक अभिनेत्याची असते.त्यामुळे देशात आणि परदेशातल्या 65 फिल्म फेस्टिवलमध्ये माझी फिल्म झळकणे ही गोष्टच माझ्यासाठी भारावून जाणारी होती. त्यात अनेक ठिकाणी माझ्या अभिनयाचे कौतुक झाले, हे ऐकून मी आनंदित होतोच. पण त्याहूनही पूढे जात अभिनयासाठीचे सर्वोत्कृष्ट चार पुरस्कार प्राप्त करणे, हा तर दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. हे सगळं अगदी स्वप्नवत आहे.”

@shubhankar_tawde @reteishd @geneliad ची #वेड लावणारी केमिस्ट्री..
@mumbainews24x7

#shubhankartawde #marathifilm #ved #vedwrapup #wrapupparty #geneliadeshmukh #reteishdeshmukh #bonding #mumbainews24x7

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns