देव माझा, तुमचा आणि सर्वांचा एकच आहे अन् म्हटलं तर वेगळाही आहे! आपल्या मनात आपण मानू तो देव असतो. मनातला हा देव आपला वैयक्तिक असतो. खरं तर देव आपल्या सदैव पाठीशी असतो असं म्हटलं जातं. असं असताना भक्तांच्याही वाट्याला दुःख, त्रास का येतं असा प्रश्न मनात येत असेल, हो ना? अहो याचं उत्तर म्हटलं तर सोपं आहे! देवावरची श्रद्धा ही संकटात चिलखतासारखी असते. लढाईत चिलखत घालून गेल्यास शत्रूकडून वार व्हायचा थांबत नसला तरी ते किमान आपल्याला सुरक्षित ठेवण्यास फायदेशीर ठरते. देवावरील श्रद्धा भक्तांच्या आयुष्यात देखील हीच किमया घडवून आणते! श्रद्धेची अनुभूती देणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. साधारण यावरच आधारित आहे फक्त मराठीची नवीन मालिका ‘देव पावला’.
‘देव पावला’ या नवीन मालिकेचे शीर्षक गीत अल्पावधीत लोकप्रिय होताना दिसत आहे. प्रसेनजीत कोसंबीने स्वरबद्ध केलेले हे गीत श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले असून त्याला शशांक पोवारचे संगीत आहे. या मालिकेतील निरनिराळ्या कथा या भक्तांच्या अनुभवांवर आधारित लेखक शिरीष लाटकर यांचा कल्पनाविस्तार आहे. त्यांच्या लेखणीतून उतरणारे दैवी अनुभव छोट्या पडद्यावर अनुभवणे प्रेरणादायक ठरेल. आतापर्यंत सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मारुती, शंभू महादेव, स्वामी समर्थ यांवरचे एपिसोड्स झाले असून येत्या काळात साई बाबा, नृसिंह, गजानन महाराज, दत्तगुरु, श्रीराम, सप्तशृंगी आदींचे विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळतील.
‘फक्त मराठी’ वाहिनीने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान घट्ट केले आहे. वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात, ‘नवनिर्मित आशय असलेल्या मालिका बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना प्रेक्षकपसंती मिळत असल्याचा आनंद आहे. अल्पावधीतच सिंधू आणि धूमधडाका हे शोज प्रेक्षकांना आवडत असल्याने आमचाही आत्मविश्वास वाढला आहे. आता देव पावलाची अनोखी संकल्पनाही प्रेक्षकांना भावेल अशी आशा व्यक्त करतो.’
देव पावलाच्या दर एपिसोडमध्ये विविध गोष्टींमार्फत माणसाची भक्ती आणि ईश्वराची शक्ती उलगडण्यात येईल. तर बघायला विसरू नका देव पावला..अनुभव श्रद्धेचा.. दर सोमवार- मंगळवार संध्याकाळी ७.३० वाजता ‘फक्त मराठीवर’!
देवपावला..अनुभव श्रद्धेचा..
+1
+1
+1
+1