विश्वातील स्वररत्न हरपले…..
साऱ्या विश्वाला आपल्या मंत्रमुग्ध स्वरांनी वेड लावणाऱ्या ‘दीदी’ अर्थात लता मंगेशकर ( ९२ ) यांचे आज मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात सकाळी ८ वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. त्यांचा पार्थिव देह साडेबारा वाजता ज्यांच्या राहत्या घरी म्हणजेच ‘प्रभूकुंज’ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार.
*पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यदर्शनासाठी दुपारी ४.३० वाजता मुंबईत येणार*
‘भारतरत्न’ सहित अनेक पुरस्कारांनी सन्मानित, १९४२ साली ‘किती हसाल’ या चित्रपटापासून कारकिर्दीला सुरुवात,
‘पहिली मंगळागौर’ सिनेमात लतादीदींचा अभिनय उर्दू उच्चार सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. ‘आयेगा आनेवाला’ गाण्याने प्रसिद्धी ची सुरुवात. ‘आजा रे परदेसी’ या गाण्यासाठी पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.
‘ये मेरे वतन के लोगो’ गाणं आजही प्रत्येकाच्या मनात, हे गाणं ऐकून नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले होते.
लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये गाणं गाणाऱ्या दीदी या पहिल्या भारतीय.
दीदींचा पाळण्यातले नांव ‘हृदया’ लता, आशा, उषा, मीना अशा चार बहिणी हृदयनाथ मंगेशकर एकुलते एक भाऊ,
वडील दिनानाथ मंगेशकर पहिले गुरू.
वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीत साधना. वेगवेगळ्या एकूण ३६ भाषात गायन केले.
पन्नास हजाराहून जास्त गाणी गायली.
जगात सर्वाधिक गाणी गाणाऱ्या गायिका म्हणून गिनिज बुकात दीदींच्या नावान विक्रम.
१९८९ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव.