अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

अनाथ मुला मुलींची आई बनलेल्या वात्सलमूर्ती ‘माई’ म्हणजेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सकपाळ ( ७३ ) यांचे आज मंगळवारी (४ जानेवारी ) रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात निधन झाले. गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. माई मुळच्या विदर्भातल्या, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी.
सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि
कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे
केले आहेत, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी
आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला
प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे
जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची
स्थापना केली आहे.
सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यातले काही :
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज
भूषण पुरस्कार (२०१२)
पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (२०१२)
महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’
(२०१०)
मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता
पुरस्कार (१९९६)
सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
राजाई पुरस्कार
‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (१९९२)
सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने
दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (२०१२).
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)
पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा
देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची
स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर
तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु
झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई
संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे
दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस
मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण
दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची
उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण
झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी
होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते.
आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना
योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे
आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.
सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन
केलेल्या आहेत त्या या प्रमाणे बाल निकेतन हडपसर ,पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
अभिमान बाल भवन , वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र , वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व
शिक्षणसंस्था, पुणे

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns