चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याने अभिनेता मोहनलाल दबून जातो असे म्हटले जाते परंतु अभिनेता म्हणतो की त्याला दबावाला बळी न पडण्यापासून दूर ठेवणारी गोष्ट म्हणजे त्याचे वैविध्यपूर्ण चित्रपट. प्रामुख्याने मल्याळम सिनेमात काम करणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत जवळपास ३५० चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मोहनलाल पुढे सांगतात “असे काही दिवस असतात जेव्हा ओझं नक्कीच खूप जास्त वाटतं. चाहत्यांना त्यांचा अभिनेता, त्यांचा नायक त्यांच्या मर्यादेत हवा असतो. त्यांना त्यांचा नायक फक्त त्यांचाच हवा असतो. आम्ही ते १०० टक्के पूर्ण करू शकत नाही. सुदैवाने, मी विविध प्रकारचे काम करत आहे.”
“मरक्कर: अरबी समुद्राचा सिंह” हे मोहनलालचे जवळचे सहकारी, चित्रपट निर्माता प्रियदर्शन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचा नुकताच आहे. १७ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रीमियर झाला. या चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्ससाठी संपूर्ण वर्ष लागले असे मोहनलाल सांगतात.
या वर्षी जाहीर झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, “मरक्कर” ने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स आणि सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार जिंकले.
“हा एक कॉस्च्युम ड्रामा आहे, आणि ‘बाहुबली’ नंतर लोकांना असे सिनेमे पाहायला आवडू लागले आहेत. या चित्रपटात वेगवेगळे अॅक्शन सीक्वेन्स देखील आहेत, कारण हा संपूर्णपणे समुद्रातील युद्धावर आधारित चित्रपट आहे,” तो पुढे म्हणाला.
या चित्रपटाचे शूटिंग मल्याळम आणि तमिळमध्ये एकाच वेळी झाले आहे. “मरक्कर” चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी मध्ये उपलब्ध असेल.