शिवआराधक बाबासाहेब पुरंदरे (१००) यांचे निधन

‘इतिहास इतिहासात सामावला’

mumbainews24x7 तर्फे भावपूर्ण आदरांजली

शिवचरित्र जगभरात पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ ‘जाणता राजा’ या महानाटयाचे प्रणेते, शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे (१००) म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचे आज (१५ ) रोजी पहाटे पुण्यात दीनानाथ मंगेशकर इस्पितळात निधन झाले.

बाबासाहेब काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज पहाटे त्यांचे निधन झाले. पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी –

शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी शब्दांच्या पलीकडे दुखत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे –

शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार
नाही:
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार –

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने
साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यु गमावला.

 

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार –

ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यम महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच
प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे.

सुधीर मुनगंटीवार –

शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा
शिवशाहीर हरपलाः सुधीर मुनगंटीवार, भाजप आमदार
शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने
शिवचरित्राचा संदर्भ ग्रंथ हरपला.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns