हो तुम्ही वाचत असलेला शब्द आणि शब्द खरा आहे. मुंबईचा जगप्रसिद्ध असा वडापाव, जो मुंबईत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रचंड आवडीने खाल्ला जातो. अगदी १० रुपया पासून सुरू होणारा हा वडा पाव, त्याच वडापावची किंमत तब्बल दोन हजार रुपये आहे विश्वास बसत नाही ना पण हे खरे आहे. मात्र….. मात्र हा वडापाव सोन्याचा आहे. अगदी २२ कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेला असा हा वडापाव दुबई येथील ‘ओ’पाव’ (O’Pao) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ९९ दिरहम म्हणजेच तब्बल २ हजार रुपयांना मिळतो. अमोल धोटे यांचे हे क्रियेशन आहे.
हा वडा चीज आणि फ्रेंच ट्रफल बटर ने भरलेला असतो तर पावाला घरगुती मिंट मेयोनीज डीप लावण्यात आलेले असते.
या वड्याला पोटॅटो फ्लेवर्ड डंपलिंग असे नाव देण्यात आले आहे.
या वड्याला उच्च दर्जाच्या फ्रेंच २२ कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आलेला असतो.
हा २२ कॅरेट ‘Gold O’Vadapav’ मिस्टिक लाकडाच्या कोरीव बॉक्स मध्ये पेश केला जातो व या बॉक्सच्या खालून नायट्रोजनची वाफ येत असते.
या सोबत रताळ्याचे तळलेले चिप्स व मिंट लेमोनेड दिले जाते.
काय मग दुबईला गेल्यावर हा सोन्याचा वडापाव खाणार न…
हा वडापाव व इतर पदार्थ मिळण्याचा पत्ता आहे,
O’Pao DXB
Behind Park Regis Hotel,
Karama, Dubai, United Arab
Emirates
सौजन्य : अमोल धोटे