”सप्तपदी मी रोज चालते’ ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत्या सोमवार, २२ मार्चपासून रात्रौ ८ :३० वाजता ‘फक्त मराठी वाहिनी’ वर येत आहे,
या मालिकेत अमृता आणि संजू यांची कहाणी पहायला मिळणार आहे. या दोघांच्या माध्यमातून पवार आणि थोरात या दोन कुटुंबाची कथाही यात आहे. अमृताला आपल्या आईप्रमाणे कर्तबगार आणि वडीलांप्रमाणे समजूतदार पती हवा आहे. कालांतराने तिच्या आयुष्यात संजूची एंट्री होते, पण त्याला काहीही न करता फक्त ऐशोआरामात जीवन जगायचं आहे. अशी ही जोडी भविष्यात ‘सप्तपदी’ कशी चालणार या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक भागागणिक मिळणार आहे. या मालिकेतील प्रत्येक करॅक्टर वास्तविक जीवनातील खरे खुरे रंग दाखवणारं असल्यानं प्रत्येकाला ही मालिका आपल्याच घरातील कथा सांगणारी असल्यासारखं वाटेल.
रिमोटपासून दूर ठेवणारं कथानक, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल असं मत या मालिकेचे दिग्दर्शक प्रवीण परब यांनी व्यक्त केलं आहे.
या मालिकेत तृप्ती देवरे, बिपीन सुर्वे, विजय मिश्रा, स्नेहा रायकर, अखिल लाले, संजना काळे, प्राप्ती बने, वंदना वाकनीस, विपुल साळुंखे, आरती शिंदे, अमित कल्याणकर, रुपाली गायके, रणजित रणदिवे, चेतन चावडा, श्रुती पारकर, हर्षदा कर्वे, पूजा यादव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. सोमवार ते शुक्रवार दररोज रात्रौ ८:३० वाजता ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही मालिक’ फक्त मराठी वाहिनी’वर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.