कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक झाले असतानाही अनेकांकडून दुर्लक्ष केले जाते असे आढळल्याने, यापुढे तोंडाला मास्क नसल्यास बेस्ट रिक्षा, टॅक्सी, मॅाल्स, कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. या सर्व ठिकाणी दर्शनी भागात ‘नो मास्क नो एन्ट्री’ चे स्टीकर लावले जाणार आहेत त्यामुळेच याबाबतची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास २०० रुपये दंडात्मक कारवाईही केली जाते आहे. ही कारवाई आता तीव्र केली जाणार आहे. त्यामुळे यापुढे घराबाहेर पडताना मास्क सोबतच बाहेर पडावे लागणार आहे.
































