लॉकडाऊन वाढण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत मात्र सूटही तेवढीच मिळणार.
कोरोनासोबत जगायचं म्हणजे काय हे शिकाव लागेल.
कोरोनाच्या गुणाकाराला कोणतीही मर्यादा नाही.
सरकारची सुरुवात झाली आणि कोरोनाचे संकट आले.
आत्तापर्यंत 13404 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
तुम्ही शिस्त पाळल्याने कोरोनाचा आकडा आटोक्यात आला.
मेच्या अखेरीस कोरोनाचा आकडा दीड लाख असतील असा अंदाज होता पण प्रत्यक्षात तेहतीस हजार ७८६ पॉझिटिव्ह.
आत्तापर्यंत राज्यात साडेतीन लाख कोरोनाच्या टेस्ट झाल्या.
आता गुणाकार जीवघेणा होणार केसेस वाढणार.
अनेक मैदाने सभागृह आम्ही सज्ज ठेवली आहेत
मे अखेरीस आपल्याकडे तब्बल चौदा हजार बेड तयार होतील
जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड्स वेळेत मिळावेत यासाठी प्रयत्न केले.
1577 आत्तापर्यंत मृत्यू.
राज्याला पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे.
ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.
सर्व आजारांपासून लांब राहणं म्हणजे कोरोना संकटापासून लांब राहणे होय.
आगामी काळात राज्यावर पावसाचे संकट येणार त्याबरोबर साथीचे रोग येणार त्यास शक्य तो टाळले पाहिजे.
सर्दी खोकला पेक्षा ताप खोकला थकवा, जेवणाची चव जाणे ही कोरोनाची लक्षणे.
थोडी लक्षण जरी दिसली तरी डॉक्टरांना दाखवा.
वेळेत दाखल झाल्यावर वेळीच उपचार झाले ते रुग्ण बरे झाले
कोरोनाच्या विरुद्ध लढणाऱ्या योद्धयांना सलाम.
राज्यातल्या डॉक्टरांकडून सुरू असलेल्या संशोधनाला यश.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाने कोरोनाशी प्रभावी लढा दिला.
शिवा भोजन योजनेतून रोज दहा लाख लोकांचे पोट भरतो.
रेशन कार्ड नसणाऱ्यांना रेशनचे धान्य देण्याची योजना आली आहे.
सरकारी रुग्णालयात 100% मोफत उपचार दिला आहे.
ट्रेनच्या भाड्यापोटी राज्याने 85 कोटी दिले.
आपण रोज 80 ट्रेनची मागणी करतोय पण मिळतात मात्र 40.
कोरोनाला टाळून आम्हाला सर्व सुरळीत करायचे आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लवकरच घेणार.
महाराष्ट्राचे अर्थचक्र कसं चालतं यावर लक्ष.
पुढच्या पंधरा दिवसात देशाचे चित्र समोर येणार.
महाराष्ट्राच्या जनतेला ही आपल्या घरी जाता येणार.
मनोरंजन सृष्टीला चित्रीकरणासाठी परवानगी देण्याचा विचार सुरू.
शेतकऱ्यांच्या बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न.
महाराष्ट्राचा आमच्या वरती विश्वास जास्त आहे व त्याला तडा मी कधीही जाऊ देणार नाही त्यामुळे कोणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये.
लॉकडाऊन अचानक लावणे व अचानक उठवणे हे बरोबर नाही आता लॉकडाऊन हा शब्द काढून टाका.
कोरोना सोबत जगायचं म्हणजे तोंडावर मास लावावाच लागेल.