ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा भारताचा पहिला मराठी चित्रपट “परिणती”.

कोविड 19 वायरस मुळे पूर्ण देश बंदिस्त आहे , त्या मुळे प्रत्येक जण भविष्य आणि वर्तमान काळाचा विचार करत आहेत. ह्या वायरस मुळे मराठी चित्रपटसृष्टि देखील बंद आहे , पण आता मराठी चित्रपट निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यातसाठी थेट ओटीटी कड़े वळणार असे वाटत आहे . बॉलीवुड चित्रपट देखील ओटीटी कड़े वळले आहेत . सध्या चित्रपटग्रहात चित्रपट प्रदशित होत नसल्याने ओटीटी हा पर्याय निर्मात्यांकड़े आहे .

चित्रपटाचे निर्माता आणि बॉलिवूडचे नामांकित कास्टिंग डायरेक्टर पराग मेहता ह्या बद्दल भाष्य करताना म्हणाले, “बॉलिवूडच्या बड्या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली पाउली टाकली आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बाजारातील सामान्य परिस्थिति अशी आहे की प्रादेशिक चित्रपटांना सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहावे लागेल कारण आपल्याला काही प्रमाणात टिकून राहावे लागणार आहे आणि त्या करिता आपल्या प्रेक्षकांना चांगली सामग्रीदेखील द्यावी लागेल. आमच्यासमोर हा एक पर्याय होता आणि डिजिटल उत्क्रांतीचा उदय म्हणून एखाद्याला पुढाकार घ्यावा लागणारच होता आणि मी तो घेतला आहे, ”ते पुढे म्हणाले की, आम्ही काहींशी चर्चेत आहोत आणि आतापर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि चित्रपट प्रर्दशित करण्याची घोषणा लवकरच केली जाईल. ”

अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांची मुख्य भूमिका असलेला “परिणती” हा ओटीटी प्लेटफॉर्म वर प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट असेल. ह्या चित्रपटाचे दिगर्दशन अक्षय बालसराफ ह्याने केले असून पराग मेहता , हर्ष नरूला चित्रपटाचे निर्माते तर अमित डोगरा सह निर्माते आहेत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns