चेटकीणीकडे बालहट्ट…जादूने माझी आई परत आणा!

*चेटकीणीकडे बालहट्ट…*

*जादूने माझी आई परत आणा!*

*चिमुकली सांगे चेटकीणीला*
*जादूने आणा माझ्या आईला*
“किती गं बाई तू हुशार
आता जादूने आई दे ना “
जादूने ह्या चिमुकलीला तिची आई परत हवी ….
अलबत्या गलबत्या २. ०  नाटकाने ९ वर्षाच्या आराध्याला दिली जगण्याची आशा..

तुम्ही ऐकले ते खर आहे .एका चिमुकलीला अलबत्या गलबत्या नाटकाला येऊन जगण्याची नवी आशा आणि नवीन उमेद मिळाली .
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी ह्यांच्या जादुई लेखणीतून अलबत्या गलबत्या ने जन्म घेतला .१२ मे २०१८ ला बालरंगभूमीने विश्वविक्रम केला.पहिल्या प्रयोगापासून ३६५ दिवसात ३३३ प्रयोग हाऊसफुल्लचे बोर्ड घेणाऱ्या ह्या नाटकाने सगळ्यांच लक्ष वेधून घेतले.
नवीन विश्वविक्रम करत राहणे हे या नाटकाच्या टीम चे वैशिष्ट ठरले.एकाच दिवशी सलग ४ ,नंतर ५ आणि चक्क ६ प्रयोग एकाच नाट्यमंदिरात ,एकाच टीमने केला ह्याचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील झाला.झी टॉकीझ चे मानाचे ४ पुरस्कार सुद्धा अलबत्या गलबत्या टीमला मिळाले.नाटकात अलबत्या गलबत्या ,राजकन्या ,राजा ,सेनापती ,प्रधान ,कुत्रे ,
मांजर ,बोका ,उंदीर आणि आपलीशी वाटणारी चेटकिण अश्या सगळ्यांनी २ तास मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्याचे काम केले.चिन्मय मांडलेकर ह्यांचे दिग्दर्शन आणि अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे ह्यांनी सतत नाविन्य देण्याचे काम अगदी चोख केले.
नुकताच अलबत्या गलबत्याचा प्रयोग ६ सप्टेंबर ला यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे होता.सगळ्यांना निशब्द एका अवघ्या ८ वर्षाच्या चिमुकलीने केले.आराध्या सध्या चाइल्ड ट्रामाची ट्रीटमेंट डॉक्टर रुपाली वाव्हाळ ह्यांच्याकडे घेत आहे.आराध्याची आई ती ६ वर्षांची असताना देवाघरी गेली .त्या धाक्यातून अजून ते लेकरू सावरले नाहीये.तिला ह्यातून सावरण्यासाठी गेले २ वर्ष ट्रीटमेंट सुरू आहे .तिचे बाबा आणि ती एकटेच राहत आहेत.डॉक्टरांनी हे अलबत्या गलबत्या नाटक ह्या आधी पाहिले होते त्यामुळे त्यांनी स्वतः ह्या लेकराला वसई वरून प्रयोगाला घेऊन आल्या. नाटक सुरू होताच ती हळू हळू त्यात रमली .हसू लागली.नाटकात घडण्याऱ्या घडामोडीना उत्तर देऊ लागली.हा चमत्कारच म्हणावा लागेल. नाटक संपताच ती जेव्हा चेटकीणीला भेटली तेव्हा “जादूने माझी आई मला परत कर “ ही भाबडी अपेक्षा तिने व्यक्त केली. राजकन्या आणि चेटकीणीला तिने घट्ट मिठी मारली.हसऱ्या चेहऱ्याने १००० व्या प्रयोगाला येणार हे सांगून ती गेली. पण संपूर्ण टीम निशब्द राहीली.खरच जादू व्हावी आणि तिला आई भेटावी असेच वाटते .खरच एखादी कलाकृती आपल्याला आपलेसे कधी करेन ही ताकद रंगभूमीत आहे.
डॉ.रुपाली वेल्हाळ एवढंही बोलल्या आज काल मुले अभ्यास आणि इतर गोष्टींमुळे भीतीदायक वातावरण अनुभवतात .मग ते हळूहळू सायकलॉजिकली डिप्रेशन मध्ये जातात .त्यांना वारंवार अश्या नाटकाचे प्रयोग दाखवले तर त्यांच्या मनातील भीती बाहेर पडते.
आराध्या च्या बाबानी संपूर्ण टीम चे आभार मानले आणि डॉक्टरांचे पाय धरले.चिमुकलीला एवढ्या दिवसांनी आनंदी पाहून त्यांना समाधान मिळाले.
खरच अलबत्या गलबत्याने लहान लेकरानांचं नव्हे तर अगदी मोठ्यांना सुद्धा भुरळ घातली आहे. ह्या नाटकाने आता १००० प्रयोगांचा पल्ला गाठला आहे.

IPRoyal Pawns