‘कलाकार आणि रसिकांना एकत्र येण्याची पर्वणी’ एनसीपीएचा ‘प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव’

‘कलाकार आणि रसिकांना एकत्र येण्याची पर्वणी’ एनसीपीएचा ‘प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव’

गुरुवार, २२ मे ते रविवार, २५ मे या कालावधीत

एनसीपीएचा ‘प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव’ साजरा होणार असून हा उपक्रम म्हणजे कलाकार आणि रसिकांना एकत्र येण्याची पर्वणीच आहे.

या चार दिवसांच्या सोहळ्यात उत्तमोत्तम नाटके, वाचन-उपक्रम आणि रंगमंचासंबंधित विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत, ज्यात मराठी रंगभूमीशी संबंधित अशा जाणकारांशी सुसंवाद साधण्याची संधी आपल्याला मिळेल.

या उत्सवात आज लोकप्रिय असलेली व्यावसायिक नाटके तसेच अनेक तरुण कलावंतांच्या प्रयोगशील कलाकृती नाट्य रसिकांना पाहायला मिळणार आहेत. रसिकांच्या प्रोत्साहनामुळे लोकप्रिय कलावंताना वाहव्वा मिळेल पण उद्याच्या रंगभूमीसाठी नवीन काही करू पाहणाऱ्या उदयोन्मुख कलाकार व रंगसंस्थांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण नाट्यरसिक म्हणून कराल. असे प्रतिपादन शरद पोंक्षे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

ते पुढे म्हणाले, ‘प्रतिबिंब’ नाट्य उत्सवाला नावाप्रमाणे, महाराष्ट्राच्या समृद्ध रंगभूमी परंपरेचा आरसा लाभलेला आहे. हाच वारसा पुढे नेणारी तरुण कलावंत पिढी आपल्यासमोर नवनवीन विषय मांडणार आहेत. ज्यातून आपल्याला एकूण जगण्यासंदर्भातील नवे भान व नवा दृष्टिकोन पाहायला मिळू शकेल.

रसिक प्रेक्षक या नात्याने आपण या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या नाट्य उत्सवांत सहभागी होऊन नाट्यकलेला उत्स्फूर्त दाद द्यावी., असे आवाहन अमृता सुभाष यांनी केले

शिल्पा कुमार यांच्या सौजन्याने प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव २०२५ साजरा होत आहे.

महोत्सवाच्या संचालिका, राजेश्री शिंदे यांनी सांगितले की, “प्रतिबिंब हा एक मराठी सांस्कृतिक उत्सव आहे जो कलाकारांना, थिएटर ग्रुप्सना, कार्यशाळा संचालकांना आणि प्रेक्षकांना एकत्र आणतो. यंदाचा प्रतिबंब नाट्य उत्सव या दृष्टीने घेतला गेलेला महत्वाकांक्षी प्रयत्न आहे, विविध विषयांवर भाष्य करणारी नाटकं, कार्यशाळा आणि इंस्टॉलेशन्स या उत्सवाचा भाग आहेत. या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट अधिकाधिक थिएटर ग्रूपसना या नाट्य उत्सवात सामील करून विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या, त्यांनी सादर केलेल्या कलाकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात. आम्हाला खात्री वाटते की ‘प्रतिबिंब’ हा राज्यातील सर्वोत्तम प्रादेशिक रंगभूमीचा अनुभव घेण्यासाठीचा वन-स्टॉप प्लॅटफॉर्म बनेल.

‘प्रतिबिंब’ नाट्य उत्सव हा मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जो आपल्या विविध शैलींतील विस्तृत सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे तो या मंचावर साकारणार आहे. तेव्हा या आणि  मंचावर सादर होणाऱ्या कथांद्वारे महाराष्ट्राच्या नाट्यमय आणि सांस्कृतिक कलाविश्वाचा अनुभव घ्या”.

चार दिवसीय नाट्य उत्सवाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:-

नाट्यउत्सवाचे वेळापत्रक:

गुरुवार २२ मे एक्सपेरिमेंटल थिएटर सायं. ७:०० वाजता

*Alive (प्रीमियर) (९० मिनिटे )*

दिग्दर्शक संकेत पारखे

शुक्रवार २३ मे एक्सपिरिमेंटल थिएटर सायंकाळी ७:०० वाजता

सोबतीचा करार (१५० मिनिटे )

दिग्दर्शक वैभव जोशी

शनिवार २४ मे जेबीटी म्युझियम सकाळी ११ ते दुपारी २:३०

अभिनय कार्यशाळा

दिग्दर्शक सचिन शिंदे

शनिवार २४ मे टाटा थिएटर दुपारी ३:०० *ज्याच्या त्याच्या विठ्ठल* (११० मिनिटे) दिग्दर्शक अमित वझे

शनिवार २४ मे एक्सपिरिमेंटल थिएटर सायंकाळी ५:०० वाजता

*ये जो पब्लिक है* १०५ मिनिटे

दिग्दर्शक विवेक बेळे

रविवार २५ मे जेबीटी म्युझियम

सकाळी ११ ते दुपारी २:३०

*कथानकांचे प्रशिक्षण*

गीतांजली कुलकर्णी

रविवार २५ मे एक्सप्रीमेंटल थिएटर

दुपारी ३:०० वाजता

*तुझी औकात काये?* (८० मिनिट)

दिग्दर्शक प्रतिक्षा खासनीस आणि निकिता ठुबे

रविवार २५ मे टाटा थिएटर

सायंकाळी ४:३० वाजता

*असेन मी नसेन मी* (१३५ मिनिटे)

दिग्दर्शक अमृता सुभाष

IPRoyal Pawns