पहलगाम येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे

पहलगाम येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे

मुंबई: दि.२४: पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे आयोजित करण्यात आलेला गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, स्वर्गीय राज कपूर आणि स्वर्गीय व्ही.शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार २०२४’ तसेच राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याची नवीन तारीख यथावकाश कळवण्यात येईल, असे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

IPRoyal Pawns