काश्मीर मध्ये साकारणार मराठी पुस्तकांचे गाव – डॉ. उदय सामंत, मंत्री मराठी भाषा विभाग.

काश्मीर मध्ये साकारणार मराठी पुस्तकांचे गाव – डॉ. उदय सामंत, मंत्री मराठी भाषा विभाग.

डॉ. उदय सामंत मंत्री मराठी भाषा यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीरमध्ये पुस्तकांचे गाव निर्माण करण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र शासनाने पुस्तकांचे गाव योजना ज्या पद्धतीने अमलात आणली आहे त्याच धर्तीवर परराज्यात देखील अशा पुस्तकांच्या गावांची निर्मिती व्हावी असे मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी व तिची जोपासना व्हावी या दृष्टिकोनातून हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे असे उदय सामंत यांनी या प्रसंगी मत व्यक्त केले.

या योजनेद्वारे परराज्यात देखील पुस्तकांचे गाव योजना ही कार्यान्वित करण्यात येणार आहे. या अगोदर भिलार व विस्तार योजनेतील ज्या गावांना पुस्तकांचे गाव करण्याचे योजना आखण्यात आली आहे या धर्तीवरच परराज्यात देखील पुस्तकांचे गाव उभारणी करून वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी या दृष्टिकोनातून ही योजना अमलात आणण्याचे मंत्री मराठी भाषा यांचे स्वप्न आहे.  याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार २ मे २०२५ रोजी काश्मीरमधील गावाचे औपचारिक उद्घाटन व घोषणा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून याची पूर्वतयारी सुरु कऱण्यात आली आहे.

         या सबंध प्रक्रियेत सरहद पुणे ही संस्था जबाबदारी घेणार असून राज्य मराठी विकास संस्था व सरहद संस्था या दोघांमध्ये एक करार करण्यात येणार आहे. या करारा नंतर मराठीच्या जतन संवर्धनासाठी अनेक उपक्रम राज्य मराठी विकास संस्था व सरहद संस्था या दोघांच्या मदतीने काश्मीरमध्ये राबवले जाणार आहेत. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून महाराष्ट्र बाहेर देखील पुस्तकांच्या गावाची निर्मिती होऊन वाचन संस्कृती वाढवून त्या राज्यांमध्ये अनुवाद केलेले पुस्तक, स्पर्धा परीक्षांचे पुस्तक व मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सदर योजना परराज्यामध्ये अमलात आणण्यासाठी उदय सामंत यांनी अत्यंत सकारात्मकता दर्शवली असून याची कार्यप्रणाली आखण्याचे काम मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था या स्तरावर सुरू आहे.

IPRoyal Pawns