छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, विजय वडेट्टीवर

*छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचा संतप्त सवाल*

*अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या निलंबनाच्या कारवाईला पाठिंबा*

*पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?*

*विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना विरोधात विरोधक आक्रमक*

मुंबई, दि.५ – आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकरणी सरकारने अबू आझमी यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधी मंडळ नेते यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य बेजबाबदार पणाचे होते. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, या कारवाईचा काळ ही वाढवला पाहिजे, सरकारच्या या कारवाईला आमचा पाठिंबा आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांवर सरकार का कारवाई करत नाही असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलं.

अबू आझमी यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधी मंडळ विजय वडेट्टीवार म्हणाले
औरंगजेब नालायक होता, त्याचे आणि अबू आझमी यांच्या वक्तव्याचे समर्थन कोणी करू शकत नाही.
अबू आझमी यांच्यावर सरकारने कारवाई करावी, त्याला आमचे समर्थन आहे..

फक्त याप्रकरणी ठेका फक्त तुम्ही घेतला का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, यांच्यावर सरकार का कारवाई करत नाही? यांना कोणाचा राजाश्रय आहे असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कोणीही केला तर कारवाई झालीच पाहिजे ही मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.
राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली.

IPRoyal Pawns