स्वामीराज प्रकाशनचा ‘एकल नाट्य महोत्सव’ 

स्वामीराज प्रकाशनचा एकल नाट्य महोत्सव

*मानसी कुलकर्णीच्या ‘सांगत्ये ऐका’ नाटकाने ‘एकल नाट्य’ महोत्सवाचा शुभारंभ*

*आठ छोट्या नाटकांनी मिळवली प्रेक्षकांची दाद*

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकाऱ्याने स्वामीराज प्रकाशनच्या वतीने माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहातील प्रायोगिक रंगमंचावर ‘एकल नाट्य’ महोत्सवाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात विविध विषयांवरील आठ छोट्या नाटकांनी रसिकांचे मनोरंजन केले. रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पुढल्या वर्षी ‘दुकल नाट्य महोत्सव’ आयोजित करण्याचा मानस रजनीश राणे यांनी बोलून दाखवला.

यशवंत नाट्यमंदिरातील प्रायोगिक रंगमंचावर कवी अशोक बागवे, आमदार महेश सावंत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, अभिनेता-दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

अनोखी नाटिका सादर निर्मित आणि मानसी कुलकर्णी अभिनीत ‘सांगत्ये ऐका’ या नाटकाने महोत्सवाला सुरुवात झाली तर महोत्सवाचा समारोप मूक आक्रोश ने झाला. या नाटकात मानसीने दिवंगत अभिनेत्री हंसा वाडकर यांची कथा नाट्यरूपात सादर केली. बालपण ते अभिनेत्री बनण्यापर्यंत हंसा यांचा प्रवास मानसीने सुरेख सादर केला. १९८०च्या दशकात जी एकल नाट्ये लिहिली, त्यातील ‘वेकिंग अप या नाटकाचे प्रवीण भोळे यांनी ‘कुकूच कू’ या नावाने मराठीत रूपांतर केले आहे. रुपाली भोळे अभिनीत या नाटकाचे दिग्दर्शन सतीश मनवर यांनी केले आहे.

याशिवा दहा बाय वीस निर्मित ‘शक्तिमानने स्कर्ट का घातलाय ?’, हिमशिखा निर्मित ‘स्टोअररुमचं काय झालं?, परिवर्तन, जळगाव निर्मित ‘नली. कादव निर्मित ‘द डिसिजन’, ‘यात्रा’सह गोव्यातील ‘मूक आक्रोश’ ही नाटके दाखवण्यात आली.

महोत्सवात अशोक बागवे यांच्या ‘नाट्य स्व धर्म’ आणि अजीतेम जोशी यांच्या ‘स्मरण रंग’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns